Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांकडून आधारची माहिती एक ऑगस्टपासून जमा केली जाणार

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Link voter Id to AAdhar card

मुक्तपीठ टीम

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार यादीतील नागरिकांचा आधार क्रमांक मिळविण्याचा उद्देश मतदारांच्या मतदार यादीतील मतदार नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे आहे. मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार निवडणूक कायद्यामध्ये व नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार १ ऑगस्ट २०२२ पासून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये विद्यमान मतदारांकडून “आधार” क्रमांक संग्रहित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीमधील प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि नियमाप्रमाणे आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहे. मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आधार संकलनामागील उद्देश आहे. तथापि, “आधार” क्रमांक सादर करणे मतदारांच्या वतीने ऐच्छिक असणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल/अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज क्र.6ब भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळांबरोबरच ERO Net. GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असणार आहे. पोर्टल/ अॅपच्या माध्यमातून मतदारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र.6ब भरुन आधार क्रमांक नोंदवून प्रमाणीकरण करता येईल. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देऊन विद्यमान मतदारांकडून नमुना क्र.6ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यात येतील. केवळ आधार सादर करण्याच्या असमर्थतेमुळे मतदारांचा नावे मतदार यादीतून काढून टाकली जाणार नाहीत, तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व विद्यमान मतदारांनी आधार क्रमांक संकलनाच्या दि. १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणाऱ्या मोहिमे मध्ये मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पत्रकातून करण्यात आले आहे.


Tags: Aadhar InformationGood news MorningMumbai Suburban Districtnews2useVotersआधार माहितीउपयोगी बातम्यागुड न्यूज मॉर्निंगमतदारमुंबई उपनगर जिल्हा
Previous Post

महाराष्ट्राला राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार, राज्यातील ६ खाणींचाही गौरव!

Next Post

क्यूआर कोड स्कॅन करा, निवृत्ती वेतनासाठी एनपीएस खाते उघडा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे…

Next Post
NPS

क्यूआर कोड स्कॅन करा, निवृत्ती वेतनासाठी एनपीएस खाते उघडा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!