मुक्तपीठ टीम
गेल्यावर्षाच्या सुरुवातीपर्यंत ४७ रुपये ९० पैसे प्रति किलो असणारा वाहनांसाठीचा सीएनजी आता ८६ रुपये प्रति किलो झाला आहे. पीएनजीही अशाच प्रकारे वाढत राहिला आहे. यामुळे सीएनजी आणि पीएनजी या दोन्ही गॅसच्या दरात जवळपास ७० टक्के दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय कारणांकडे बोट दाखवत स्वस्ताई आणि प्रदूषणमुक्त प्रवासाच्या आवडीतून गॅसवरील गाड्यांकडे वळलेल्या ग्राहकांना मोठा फटका दिला जात आहे. आता सरकारने गॅस दरवाढीत होरपळणाऱ्या ग्राहकांची दखल घेतली आहे. सरकारने त्यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा नेमका काय फायदा होतो, ते लवकरच कळेल.
सीएनजी गॅसच्या महागाईचा भडका
महिना प्रति किलो दर झालेली वाढ
ऑगस्ट२०२२ ८६ रुपये ६ रुपये
जुलै २०२२ ८० रुपये ४ रुपये
मे २०२२ ७६ रुपये ४ रुपये
एप्रिल २०२२ ७२ रुपये २२.६० रुपये
एप्रिल २०२१ ४९.४० रुपये १.५० रुपये
फेब्रुवारी २०२१ ४७.९० रुपये ०.० रुपये
इंधनाच्या वापरामुळे गेल्या वर्षभरात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत, असे कारण सांगितले जात आहे.
आता घरातील पाइप आणि वाहनांचा सीएनजी स्वस्त होणार?
- सुमारे तीन महिन्यांपूर्वी, मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह इंधन सीएनजी आणि पीएनजीची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या एलएनजीचा वापर करण्याचे निर्देश दिले.
- आता मात्र महागाईचा भडका पाहून वाहनांच्या गॅससाठी मुख्यतः देशांतर्गत उत्पादित गॅसचा पुरवठा करण्याच्या जुन्या धोरणाकडे वळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि दिल्लीच्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) यांच्यासारख्या शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी पुरवठा १७.५ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वरून २७.७८ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन करण्यात आले आहे.
- ९४% वाढीव पुरवठ्याचा वापर वाहनांमध्ये सीएनजी आणि घरांमध्ये पीएनजीसाठी करण्यात येईल.
- पूर्वी केवळ ८४ टक्के गॅस देशातून येत होता, उर्वरित गॅस गेल कंपनी आयात करत होती.
- आयातित इंधनाऐवजी घरगुती गॅसचा वापर केल्यास कच्च्या मालाची किंमत कमी होईल आणि सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होतील.
- ऑपरेटर्सच्या महागड्या एलएनजीच्या वापरामुळे गेल्या वर्षभरात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.