मुक्तपीठ टीम
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई महानगर गॅसने सीएनजीच्या गॅसच्या दरात प्रतिकिलो २.५८ रुपयांनी वाढ केली आहे. तर घरगुती गॅसच्या किमतीत ५५ पैशांची वाढ केली आहे. या दरवाढीने आधीच महागाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता गॅसची दरवाढ सहन करावी लागणार आहे.
वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्याचे कारण महानगर गॅस लिमिटेडने दिले आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यात आणि घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.
नवे दर किती?
- मुंबईत सीएनजी एक किलोसाठी ५१.९८ रुपये इतका असेल.
- तर पाईप गॅससाठी ग्राहकांसाठी प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात आली आहे.
- त्यानुसार स्लॅब-१ साठी ३०.४० रुपये प्रति युनिट आणि स्लॅब-२ साठी ३६ रुपये प्रति युनिट दर असेल.
- काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती गॅसच्या किंमतीत २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
- तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत ८४ रुपयांनी वाढली होती