Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाहनचालक गॅसवर! सीएनजी आता पेट्रोल-डिझेलच्या भाववाढ स्पर्धेत, सीएनजी ८६ तर पीएनजी ५२.५०!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

मुक्तपीठ टीम

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसमान्यांना घाम फुटला आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो ८६ रुपये तर पीएनजीचे दर प्रति किलो ५२.५० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईत ३ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू असेल.

यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ!!

  • देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
  • महानगर गॅस लिमिटेड ( MGL) ही मुंबईत सीएनजी आणि पीएनची पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत आहे.
  • या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर १२ जुलै रोजी वाढले होते.
  • त्यावेळी सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती.
  • त्यापूर्वी २९ एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
  • त्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर

  • आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही.
  • महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
  • दरम्यान, १४ जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ५ रुपये आणि ३ रुपयांची कपात केली होती.
  • देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
  • तर दिल्लीत पेट्रोल ९६.२७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

Tags: CNGMGLmumbaiPetrol diesel pricePNGपीएनजीपेट्रोल-डिझेलमहानगर गॅस लिमिटेडमुंबईसीएनजी
Previous Post

गुजरातच्या राजकोट एम्समध्ये ‘प्राध्यापक’ पदाच्या ८२ जागांवर करिअर संधी

Next Post

प्रदूषणमुक्त प्रवास, रेल्वेचं लक्ष्य!

Next Post
प्रदूषणमुक्त प्रवास, रेल्वेचं लक्ष्य!

प्रदूषणमुक्त प्रवास, रेल्वेचं लक्ष्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!