मुक्तपीठ टीम
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसमान्यांना घाम फुटला आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो ८६ रुपये तर पीएनजीचे दर प्रति किलो ५२.५० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईत ३ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू असेल.
यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ!!
- देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
- महानगर गॅस लिमिटेड ( MGL) ही मुंबईत सीएनजी आणि पीएनची पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत आहे.
- या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर १२ जुलै रोजी वाढले होते.
- त्यावेळी सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती.
- त्यापूर्वी २९ एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
- त्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर
- आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही.
- महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
- दरम्यान, १४ जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ५ रुपये आणि ३ रुपयांची कपात केली होती.
- देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
- तर दिल्लीत पेट्रोल ९६.२७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.