मुक्तपीठ टीम
साकीनाक्याच्या नराधमाला सोडणार नाही. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. साकीनाक्याचा नराधम मोहन चौहानला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
साकीनाक्यात काय घडले?
पीडित महिलेवर अत्याचार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याची घटना साकीनाका येथे गुरुवारी रात्री घडली. आरोपीला काही वेळातच नराधम आरोपीला जेरबंद करण्यात आले. पीडितेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी तिचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तीव्र प्रतिक्रिया
- साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे.
- गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल.
- खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल.
- झालेली घटना निंदनीय आहे.
- हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल.
मुख्यमंत्र्यांकडून तपासाला गती देण्याचे निर्देश
- मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली
- यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे.
- त्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंशीही ते बोलले आहेत.
- तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.