Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“समाजाबरोबर चालणाऱ्या मराठी रंगभूमीची वाटचाल कलादालनातून प्रेक्षकांना अनुभवता यावी”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

April 6, 2021
in सरकारी बातम्या
0
Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

मराठी रंगभुमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभुमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगमंच कलादालनाच्या उभारणीचा आराखडा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निश्चित करण्यात आला.

कलादान स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्याचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे तसेच बिर्ला क्रिडा केंद्राच्या वास्तूचा पुनर्विकास व कलादालनाच्या निर्मितीकरिता स्थापन समितीचे सदस्य अभिनेते सर्वश्री आदेश बांदेकर, विजय केंकरे, सुबोध भावे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासह अन्य शासकीय सदस्य आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे नियोजन व्हावे. याठिकाणी नाटक पाहता येईल, पण प्रेक्षकाना मराठी रंगभूमीची वाटचालही अनुभवता येईल. ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र तर व्हावेच, पण त्याचबरोबर रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखवणारे उत्तम असे संग्रहालय साकारण्यात यावे. संग्रहालय आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हावे असे नियोजन आतापासूनच करण्यात यावे.

कलादालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास दृकृ-श्राव्य संग्रहालय, त्रिमिती सादरीकरणाची व्यवस्था याबराबरोच रंगभूमीच्या वाटचालीशी निगडीत शासनाच्या विविध विभागांकडे उपलब्ध संदर्भ, दस्तऐवज आदी गोष्टींबाबत समन्वय साधण्याचे आणि या कामाला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.

या कलादालनासाठी १७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आराखडा निश्चिती तसेच विविध संकल्पना आणि कार्यान्वयनांसाठी १० कोटीं रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

अठरा दालने आणि अद्ययावत सभागृह, ग्रंथालय अशा विविध सुविधांनी युक्त असा या कलादालनाबाबचा आराखडा वास्तू रचनाकार शशांक मेहंदळे, पराग केंद्रेकर यांनी सादर केला, चर्चेअंती हा आराखडा निश्चित करण्यात आला.

 


Tags: chief minister uddhav thackerayमराठी रंगभूमीमराठी रंगमंच कलादालनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

ईव्हीएम चमत्कार! यादीत ९० मतदार, पण १८१ मतदारांचं मतदान !

Next Post
assam election

ईव्हीएम चमत्कार! यादीत ९० मतदार, पण १८१ मतदारांचं मतदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!