मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊदे, राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे. राज्यातील जनता सुखी होऊ दे, असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जेजुरी देवस्थान परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. देवस्थान परिसराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जेजुरी गडाचे जतन व संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.
दर्शन घेतल्यानंतर श्री खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी येथील मंदिराचा कलशपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी विश्वस्त तुषार शहाणे, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडे, संदीप जगताप, अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून फुरसुंगी-ऊरूळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची केली पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवेली तालुक्यातील तुकाई टेकडी येथे फुरसुंगी-ऊरूळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पुणे मनपाचे पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली.