मुक्तपीठ टीम
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना होत असला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्यात शिंदे-फडणवीस असे दोघांचेच मंत्रिमंडळ असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. पण, आमचे सरकार नीट चालले आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले असून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उत्तर दिलं आहे.पुण्यातील आढावा बैठकीत ते आज बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
- एकनाथ शिंदे म्हणाले, ‘पूर परिस्थिती असताना मी आणि उपमुख्यमंत्री गडचिरोलीला गेलो होतो.
- हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आले होते.
- ते वापरायचे होते, पण पाऊस इतका जोरात होता की हेलिकॉप्टरने जाऊ शकलो नाही.
- मात्र, आम्ही पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.
- रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.
- राज्य सरकारच्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार व्यवस्थित चालत आहे की नाही? असा प्रश्न विरोधकांनी केला आहे.
- असा प्रश्न त्या विरोधकांनी केला आहे, ज्यांनी शेतकऱ्यांची ५० हजार रुपये देण्याची योजना बंद केली होती.
- आम्ही त्याची अंमलबजावणी केली आहे.
- पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्याचंही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ राज्याला मिळायला हवा- एकनाथ शिंदे
- केंद्र सरकारच्या योजनांमध्ये दिरंगाई झाली आहे का, याचा आढावा घेण्यात आला आहे.
- केंद्र सरकारशी संबंधित प्रकल्प व इतर प्रश्नांची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ राज्याला मिळायला हवा.
- त्यामुळे या योजनांचा आढावा घेण्यात आला आहे.
- पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे काम केले जाणार आहे.
- विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यावर भर दिला जाणार आहे.
- याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास आराखडा पुढे ढकलण्यात आला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.