मुक्तपीठ टीम
एकनाथ शिंदे यांनी ४० नाराज आमदारांसह शिवसेना विरोधात बंड केला. यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळून गुरुवारी शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि या सत्तासंघर्षाला पूर्णविराम लागला.यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तुमची घुसमट होत होती का? असं विचारलं असता, मी असं कधीही म्हटलं नाही. आजच मी सगळं बोलणार नाही, वेळ आल्यास नक्की उत्तर देऊ, असे ते म्हणाले.
शिंदेंसाठी मुख्यमंत्री पद अनपेक्षित!
- मला हे सर्व अनपेक्षित होतं.
- पण लोकांमध्ये असा समज होता की, भारतीय जनता पार्टी स्वत:ला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून फोडाफोडीचं राजकारण करत आहे.
- पण सगळ्यांचा दावा त्यांनी खोटा ठरवला.
- त्यांच्याकडे संख्याबळ जास्त असून देखील त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला.
भाजपामध्ये शिस्तीला फार महत्त्व!
- भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्तीला फार महत्त्व असतं.
- मुख्यमंत्रीपदाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असता ते म्हणाले, ज्या पक्षानं मला सर्वोच्च पद दिलं.
- आज त्याच पक्षाचा आदेश आहे की मी उपमुख्यमंत्रीपद सांभाळायचं आहे.
- पक्षाचा आदेश मानून त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
- १७० आमदारांचं सरकार टिकणार नाही तर कुणाचं सरकार टिकेल.
- हे शिंदे सरकार नाही, हे सामान्य जनतेचं सरकार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घुसमट होत होती का?
- मी असं कधीही म्हटलं नाही.
- आजच मी सगळं बोलणार नाही.
- वेळ आल्यास नक्की उत्तर देऊ.