Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे कार्य गतीने असल्याचा केंद्राचा दावा! पण सात वर्षे काय झाले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
marathi

मुक्तपीठ टीम

“देशाला मराठी भाषा व साहित्याचा अभिमान आहे, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य होत असून मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार आहे,” अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसदेत दिली.

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्नाद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मेघवाल यांनी माहिती दिली. याविषयावरील चर्चेत खासदार सर्वश्री डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आणि रजनीताई पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. केद्र सरकारने आता जरी ते कार्य गतीने सुरु असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात त्याबद्दलचा अहवाल सादर होऊन सात वर्षे उलटली तरी तो का मिळाला नाही? सात वर्षे टाळाटाळ का केली? असे प्रश्न अहवाल सादर करणाऱ्या रंगनाथ पठारे समितीचे सदस्य प्रा. हरी नरके यांनी उपस्थित केले आहेत.

Marathi (2)

अभिजात मराठीसाठी आतापर्यंत काय?

  1. २०१३ साली अभिजात मराठीचा (पठारे समितीचा ) अहवाल केंद्राला सादर
  2. ५ फेब्रुवारी २०१५ ला केंद्र सरकारच्या भाषा तज्ज्ञांनी अहवालाला मंजुरी दिली.
  3. तेव्हापासून गेली सातआठ वर्षे हा अहवाल केंद्रातील मोदी सरकारकडे प्रलंबित आहे.

 

अभिजात मराठीच्या दाव्याच्या मांडणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या रंगनाथ पठारे समितीमध्ये प्रा. हरी नरकेही होते. त्यांनी ‘मुक्तपीठ’शी बोलताना २०१५पासून अहवाल सादर केला असूनही मोदी सरकारने मराठीला हा दर्जा दयायला सात वर्षे टाळाटाळ केली आहे, असा आरोप केला. त्यामुळे आता तरी त्यांनी तो द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

राज्यसभेत काय घडलं?

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित विषयावर बोलताना श्री मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीविषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव हा सांस्कृतिक मंत्रालयाकडून भाषा तज्ज्ञांच्या समितीकडे पाठविण्यात आला. या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे गेला व तेथे काही त्रुटींची पूर्तता झाली आहे. सध्या, हा प्रस्ताव आंतरमंत्रालय स्तरावर विचाराधीन आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आदी मंत्रालयांतर्गत सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून या विषयाला गती आली आहे.आवश्यक चर्चा व कार्यवाहीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे, मेघवाल यांनी सांगितले.

 

अद्यापपर्यंत देशातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने २००४ मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मूळ निवेदन निर्गमीत केले होते.तद्नंतर, २५ नोव्हेंबर २००५ रोजी गृहमंत्रालयाने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्था म्हणून जाहीर केले असल्याचेही श्री मेघवाल यांनी यावेळी सांगितले.


Tags: Education DepartmentMarathi LanguagePriyanka Chaturvedipro. hari narakeकेंद्रीय गृह मंत्रालयकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्थाप्रा. हरी नरकेमराठी भाषाशिक्षण मंत्रालयसांस्कृतिक मंत्रालय
Previous Post

गोदरेज इंडस्ट्रीजचा वालिया प्रकल्प ग्रीनको प्लॅटिनम मानांकन मिळविणारे पहिले भारतीय रासायनिक उत्पादन केंद्र

Next Post

राज्यात १३ हजार ८४० नवे रुग्ण, २७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १३ हजार ८४० नवे रुग्ण, २७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!