मुक्तपीठ टीम
गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भामरागडमधील जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकावर हल्ला केला. या पथकातील कमांडोंनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पळून गेले.
गडचिरोलीतील डोडराज जंगलाजवळ चकमक
- भामरागडमधील डोडराज जंगलाजवळ ही चकमक झाली.
- गडचिरोली पोलिसांचे विशेष लढाऊ युनिट सी-६० कमांडोचे पथक या भागात गस्त घालत होते.
- जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गस्ती पथकावर अचानक हल्ला केला.
- नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, पोलीस कमांडो जवानांनी प्रत्युत्तर दिले.
कमांडोंच्या प्रत्युत्तरानंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले
- काही वेळ गोळीबार केल्यानंतर माओवादी जंगलात पळून गेले.
- भामरागडच्या जंगलात शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोलीत सी-६० कमांडोसोबत झालेल्या भीषण चकमकीत मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी ठार झाले होते.