Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उलवे-करंजाडेमधील ओसी न मिळालेल्या इमारतींनाही पाण्याची जोडणी देण्याचा सिडकोचा निर्णय

October 24, 2021
in Uncategorized, घडलं-बिघडलं
0
cidco

मुक्तपीठ टीम

पाण्याची अत्यावश्यक गरज लक्षात घेता विमानतळ पुनर्वसन क्षेत्रातील (रिहॅबिलीटेशन ॲन्ड् रिसेट्लमेन्ट – आर ॲन्ड् आर) पॉकेट क्र. १ ते ७ मधील करंजाडे आणि उलवे येथील अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) प्राप्त न झालेल्या इमारतींना पाण्याची
जोडणी देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. तसेच या जोडण्यांकरिता आकारण्यात येणारे पाण्याचे दर हे देखील अन्य प्राधिकरणे/स्थानिक शासन संस्थांपेक्षा कमी आहेत.

 

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, “विमानतळ प्रकल्पबाधितांना आवश्यक त्या सोयी सुविधा प्राधान्याने पुरविण्यास सिडको नेहमीच प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी सिडकोला नेहमीच सहकार्य केले आहे. याची जाण ठेऊन पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रातील पॉकेट क्र. १ ते ७ करंजाडे आणि उलवे येथील अद्याप भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या इमारतींनाही पाण्याची जोडणी देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.”

 

सिडकोतर्फे रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादन करून, ११६० हेक्टरवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. सदर विमानतळ प्रकल्पबाधितांना राज्य शासनाने मंजूर केलेले सर्वोत्तम असे पुनर्वसन आणि पुन:स्थापन पॅकेज अदा करण्यात आले आहे. या पॅकेज अंतर्गत विमानतळा नजीकच्या क्षेत्रात पुष्पक नोड हे सर्व पायाभूत सोयी सुविधांनी युक्त असे पुनर्वसन आणि पुन:स्थापन क्षेत्र विकसित करण्यात येत असून प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.

 

या जोडण्यांकरिता आकारण्यात येणारे पाण्याचे दर हे देखील मुंबई महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ व पनवेल महानगरपालिका यांच्यापेक्षा कमी आहेत.
तरी ज्या सदनिकाधारकांची इमारत पूर्ण झालेली असून काही नियामक अडचणींमुळे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यास विलंब होत असल्यास सदनिकांधारकांनी पाण्याच्या नळजोडणीसाठी कार्यकारी अभियंता, चौथा मजला, रायगड भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई –
४००६१४  येथे संपर्क साधावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात येत आहे.


Tags: CIDCOdr sanjay mukherjeenavi mumbai international airportwaterlineडॉ. संजय मुखर्जीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळपाण्याची जोडणीसिडको
Previous Post

भारत-पाकिस्तानचा आजचा महा सामना, वाराणसीच्या गंगा आरतीत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ जशी आहे तशी…

Next Post
PM Modi Maan ki baat 24-10-21

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' जशी आहे तशी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!