मुक्तपीठ टीम
गुगलने तंत्रज्ञानाकडे वाटलाच करत हळू-हळू स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणण्याची योजना आखली आणि ते आणलेही. आताही गुगल टीव्ही आणण्याची योजना आखत आहे. गुगल टीव्हीची आतुरतेने वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मिळालेल्यानुसार, क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही भारतात आणि इतर ११ देशांसोबत लॉंच होत आहे. मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस अमेरिकेत २०२० मध्ये लाँच करण्यात आला.
क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही 4K एचडीआर व्हिडीओ प्लेबॅक आणतो आणि त्यात डॉल्बी व्हिजन सपोर्ट देतो. नेव्हिगेशनसाठी डिव्हाइस रिमोटसह येतो. मागील पिढीतील क्रोमकास्ट मॉडेल्सच्या विपरीत, क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी तसेच कम्पॅटेबल अॅप्सच्या लिस्टमध्ये पोहोचण्यासाठी डेडिकेटेड गुगल टीव्ही अॅक्सेस आणतो.
गुगल टीव्ही या १२ देशांमध्ये लॉंच होणार
- क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही १२ अतिरिक्त देशांमध्ये लॉंच होत आहे.
- यामध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि तैवान तसेच आठ युरोपीय देश ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन आणि नेदरलँड यांचा समावेश असेल.
भारतात केव्हा लाँच होणार?
- क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही २१ जून रोजी युरोपमध्ये लाँच होणार आहे.
- तसेच, भारतात क्रोमकास्ट विथ गुगल टीव्हीच्या उपलब्धतेबद्दल आणि इतर उर्वरित बाजारपेठेबद्दल इतर माहिती मिळालेली नाही आहे.
क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही नवीन बाजारपेठेतील थर्ड पार्टी किरकोळ विक्रेत्यांकडून आधीच उपलब्ध आहे. सध्याच्या युनिट्सना कंटेंट बाजूने चालण्यासाठी इंटरफेस आणि स्थानिक सेवा आणि स्थानिक भाषांसह “लोकलाइज्ड फिचर्स” समर्थन देण्यासाठी एक अपडेट प्राप्त होईल अशी माहिती मिळाली आहे.
क्रोमकास्ट विथ गुगल टीव्हीचे फिचर्स
- गुगलने त्यांच्या सध्याच्या मीडिया स्ट्रीमिंग मॉडेलपेक्षा एक मोठा फरक म्हणून नवीन क्रोमकास्टवर गुगल टीव्ही अॅक्सेस सादर केला आहे.
- डिव्हाइस ६० फ्रेम्स प्रति सेकंद फ्रेम रेटने 4K HDR सामग्री वितरीत करण्यास देखील सक्षम आहे.
- याव्यतिरिक्त, कम्पॅटेबल कंटेंटसाठी अधिक चांगला व्हि्यूईंग एक्सपिरियन्स प्रदान करण्यासाठी ते डॉल्बी व्हिजनने सक्षम आहे.
- मागील क्रोमकास्ट मॉडेल्सप्रमाणेच, क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही नियमित टीव्ही सेटसह कनेक्टिव्हिटीसाठी पारंपारिक एचडीएनआय इंटरफेससह येतो.
- गुगल असिस्टंटमध्ये प्रवेश करण्यासाठी डेडिकेटेड-की असलेल्या रिमोटसह डिव्हाइस देखील एकत्रित केले आहे.