Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिजिटल ट्रान्झॅक्शन! आता यूपीआय अॅपद्वारेही एटीएममधून पैसे काढता येणार

June 6, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
WhatsApp UPI Payment

मुक्तपीठ टीम

भारतात डिजिटायझेशनचा वावर खूप वेगाने वाढत आहे. या डिजिटायझेशनमुळे रोख व्यवहाराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल केले जात आहेत. त्याचबरोबर लोकांचा ताण आणि होणारा त्रासही कमी झाला आहे. याचा लाभ सर्वसामान्यांनाही मिळत आहे. लोकांना बँका सुरू होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. यासोबतच बँकेबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहणाऱ्यांनाही सूट मिळू लागली आहे.

एकमेकांना पैसे पाठवणे आता झाले सोपे

  • भारतात आजकाल ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत झपाट्याने वाढत आहे.
  • लोक नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, यूपीआयद्वारे अवघ्या काही मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात.
  • याशिवाय रोख रकमेची गरज भासल्यास सर्वत्र लावलेल्या एटीएम मशीनमधून लोक पैसे काढू शकतात.

जर, डेबिट कार्ड घरी विसरला असाल तर, टेंशनची गरज नाही कारण, आता देशातील काही बँका अशाही आहेत ज्या एटीएम कार्डविना पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. यासोबतच रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने यूपीएच्या माध्यमातूनही ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आता बँकांच्या एटीएम मशीनमध्ये ही सुविधा सुरू करण्यासाठी यूपीआय पर्याय अपडेट केला जात आहे. एटीएममध्ये यूपीआय पर्याय अपडेट होताच एटीएम मशीनद्वारे रोख पैसे काढण्याची सुविधा सहज मिळू शकेल. यासाठी गुगल पे, पेटीएम, फोनपे इत्यादी अनेक प्रकारचे यूपीआय अॅप्स वापरता येतील. यामुळे लोकांना याचा फायदा होणार आहे.

एटीएम मशीनमधून पैसे काढण्याच्या सोप्या पद्धती

  • सर्वप्रथम, एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर यूपीआयसह कॅश विथड्रॉवल पर्याय निवडा.
  • आता एटीएम मशीनमध्ये क्यूआरकोड दिसेल, तो यूपीआय अॅपद्वारे स्कॅन करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पैसे किती काढायचे आहेत ते तिथे लिहा.
  • यानंतर स्मार्टफोनमध्ये यूपीआय पिन टाका.

पाहा व्हिडीओ:


Tags: ATM Cash ServicesDigital TransactionsDigitizationgood newsmuktpeethUPI Appएटीएम रोख सेवाचांगली बातमीडिजिटल ट्रान्झॅक्शनडिजिटायझेशनमुक्तपीठयूपीआय अॅप
Previous Post

हिमाचलच्या पर्वतावर बैजनाथ मंदिर, १३ व्या शतकातील स्थापत्यशैली, अप्रतिम शिल्पकाम!

Next Post

क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही भारतासह १२ देशांमध्ये लाँच होणार! 4K सह भन्नाट फिचर्स!

Next Post
Chromecast with Google TV

क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही भारतासह १२ देशांमध्ये लाँच होणार! 4K सह भन्नाट फिचर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!