Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात संजय राठोडांच्या समावेशाने चित्रा वाघांची डरकाळी! असे वादग्रस्त नवे मंत्री आणखी कोण?

August 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
famous leaders

मुक्तपीठ टीम

गेल्या ४० दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा छोटेखाणी विस्तार झाला आहे. राजभवनातील हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटातील वादग्रस्त नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आल्याने भाजपामध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी शिंदे गटातील संजय राठोड यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. संजय राठोड यांना शपथ देण्यात आल्यामुळे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राठोडांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे नव्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त नेत्यांच्या समावेशाचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. आणखी कोण आहेत, असे मंत्री याचा आढावा…

चित्रा वाघ आक्रमक!!

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.

राठोडांवर काय होते आरोप?

  • संजय राठोड हे ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते.
  • पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीचा गूढ मृत्यू झाला.
  • त्या मृत्यूसाठी संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपाने आक्रमक भूमिका घेतली.
  • अखेर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली.
  • काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी त्या प्रकरणातून राठोडांचा संबंध नसल्याचा दावा केला.
  • तरीही भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणे सुरु ठेवले.

वादग्रस्त नवे मंत्री कोण?

संजय राठोड

संजय राठोड हे यवतमाळमधून निवडून येणारे शिवसेनेचे आमदार. ठाकरे सरकारमध्ये ते वनमंत्री होते. पुण्यात पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला संजय राठोड कारणीभूत असण्याचा आरोप करत भाजपाने रान उठवलं होतं. अखेर राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांचा समावेश झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी राठोडांना मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे, असं म्हटलं आहे. तसेच संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला, तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे…जितें, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

विजयकुमार गावित

  • भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
  • राज्याच्या गृहविभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गावित आणि नातेवाईकांविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
  • याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली होती.
  • त्यात माजी मंत्री गावित, त्यांचे आमदार बंधू शरद आणि काही कुटुंबीयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला होता.
  • आदिवासी विकास मंत्रालयाशी संबंधित सहा हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या गायकवाड समितीनं सादर केलेल्या अहवालाची छाननी करण्यासाठी फडणवीस सरकारने आणखी एक समिती नेमली होती.
  • आदिवासी विकास घोटाळ्यात चौकशी समितीच्या अहवालानंतरही आरोपींविरोधात कारवाई का केली नाही?
  • यावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठीने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

अब्दूल सत्तार

टीईटी परीक्षेत घोटाळा खूप गाजला. त्यात अब्दूल सत्तार यांच्या दोन मुलींचाही समावेश असल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, सत्तारांनी फक्त मुलाला मुख्यमंत्र्यांकडे नेऊन आणि न्यूज चॅनल्सच्या मदतीने चालवलेली क्लीनची मोहीम यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

संदिपान भुमरे

संदिपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री होते. त्यांच्यावर रोहयो हजेरी प्रकरणात आरोप झाला होता. पुढे ते प्रकरण हजेरी कारकुनांवर कारवाई करुन संपले. तसेच कोरोना काळातील मदत आणि भूखंड प्रकरणातही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.


Tags: abdul sattarBJPchitra waghSandipan Bhumaresanjay rathodShivsenaTETअब्दुल सत्तारचित्रा वाघभाजपाशिवसेनासंजय राठोडसंदिपान भुमरे
Previous Post

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, दोघांचे मंत्रिमंडळ आता वीसजणांचे झाले!

Next Post

लोकशाहीसाठी निवडणुकांचं महत्त्व…समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Next Post
Kolhapur election one of the 'twelve' proofs of identity will used for voting

लोकशाहीसाठी निवडणुकांचं महत्त्व...समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!