Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीनं उघड केलं चीनी अॅप्सचं पाप, हजारो कोटी भारतातून मायदेशी लंपास!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ed

मुक्तपीठ टीम

एकीकडे लडाखच्या सीमेवर आपले सैन्य चीनशी लढत आहेत, तर दुसरीकडे चीनचे आव्हान देशामध्येही उभे आहे. सीमेवर लष्कर तर देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यात चीन गुंतला आहे. ईडीच्या तपासानंतर अशाच सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ईडीच्या तपासात ही बाब समोर आली आहे की, मोबाईल अॅपच्या माध्यमातून चीन भारताचे आर्थिकदृष्ट्याही प्रचंड नुकसान करत आहे. ईडीला कर्ज, सट्टेबाजी आणि डेटिंगशी संबंधित १०० हून अधिक चिनी अॅप सापडले आहेत, ज्याद्वारे चीनने हजारो कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ईडीच्या तपासात धक्कादायक बाब उघड!!

  • तपासादरम्यान, ईडीला कर्ज, सट्टेबाजी आणि डेटिंगशी संबंधित १०० हून अधिक अॅप सापडले आहेत, जे चीनमधून नियंत्रित आहेत.
  • केवळ सट्टेबाजी अॅपद्वारे १ हजार ३०० कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे.
  • काही चिनी नागरिकांनी बेकायदेशीरपणे अनेक भारतीय कंपन्या स्थापन केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
  • या कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटींचा महसूल जमा झाला.
  • मग हे पैसे भारत सरकारपासून लपवून चीनला नेले.
  • चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने हे चीनी नागरिक हेराफेरी करत आहेत.
  • सुरुवातीला डमी भारतीय संचालकांचा वापर करून कंपन्या तयार केल्या जातात,काही काळानंतर चिनी नागरिक भारतात येतात आणि या कंपन्यांमध्ये संचालक होतात आणि मग त्यांचा खेळ सुरू करतात.

भारतीयांचाही यात सहभाग!

  • अंमलबजावणी संचालनालयाने HSBC बँकेतील दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये अवैध पैसे ट्रांसफरसाठी चिनी सट्टेबाजी आणि डेटिंग अॅपशी जोडलेल्या ४७ कोटी रुपये गोठवले होते.
  • यानंतर ईडीने व्यवहारांची एफआययू (फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट) कडे तक्रार केली नसल्याने पेटीएम, कॅशफ्री आणि रेझरपे यासह अनेक पेमेंट गेटवेवर लक्ष केंद्रित केले.
  • या दरम्यान गेल्या आठवड्यात इन वॉलेट्समधून १७ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
  • ही रक्कम कथितपणे चायना लोन अॅप आणि संबंधित संस्थांच्या मालकांची असल्याचे सांगण्यात आले.
  • हे अॅप्स भारतातील खंडणीमध्येही सामील आहेत. तपासादरम्यान असे आढळून आले की, भारतीय नागरिकही यामध्ये सामील आहेत आणि त्यांना बँक आणि व्यवसाय खाते उघडण्याच्या उद्देशाने ठेवले जाते.

Tags: chinaChinese AppsEDIndiaईडीचिनी अप्सचीनभारत
Previous Post

विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती पुन्हा लटकणार?

Next Post

संकष्टी चतुर्थीला निरोप घेणारा अंधेरीचा राजा! बडोद्यातील लक्ष्मी पॅलेसचा देखावा पाहण्यासाठी आझाद नगरला चला!

Next Post
Andhericha Raja

संकष्टी चतुर्थीला निरोप घेणारा अंधेरीचा राजा! बडोद्यातील लक्ष्मी पॅलेसचा देखावा पाहण्यासाठी आझाद नगरला चला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!