Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगावरील चीनचं ‘महाकाय रॉकेट संकट’ अखेर समुद्रात कोसळले!

चीनचं रॉकेट होतं कसं? चीनची अंतराळात सत्ता गाजवण्याची मोहीम आहे कशी? सर्व माहिती एकत्र

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
China Long march 5b rocket collapsed

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकटानंतर चीनच्या ‘लाँग मार्च 5 बी’ या महाकाय रॉकेटमुळे संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. अनियंत्रित झालेले हे रॉकेट अखेर पृथ्वीवर कोसळले आहे. आज सकाळी या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळले आहेत. चीनी माध्यमांनुसार ‘लाँग मार्च 5 बी’ रॉकेटचे काही अवशेषांनी बीजिंगमधील वेळेनुसार (०२२४ जीएमटी) सकाळी १०:२४ वाजता वातावरणात प्रवेश केला आणि ते एका ठिकाणी कोसळले. भारताच्या दक्षिण-पूर्व आणि श्रीलंका – मालदिवजवळच्या सागरी परिसरात ते कोसळले आहे तर बहुतेक अवशेष वातावरणात प्रवेश करतानाच जळून गेले.

 

२९ एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट लॉँच करण्यात आले. स्पेस स्टेशन बांधण्यासाठी हे रॉकेट अंतराळात साहित्य घेऊन जात होते. हे रॉकेट एका मॉड्यूलर स्पेस स्टेशनपर्यंत गेलं. त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे रॉकेटवरील नियंत्रण गमावले
गेले. तेव्हापासून ते पृथ्वीवर कोसळून हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अखेर ते समुद्रात कोसळले आहे.

 

चीनचे महाकाय रॉकेट, पृथ्वीला कसा होता महाधोका?

  • चीनने ‘लाँग मार्च ५ बी’ रॉकेट त्यांच्या अवकाश मोहिमेंतर्गत गुरुवारी प्रक्षेपित केले होते.
  • या रॉकेटने अंतराळ स्थानकाचे भाग नेण्यात आले होते.
  • त्यानंतर ते रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले होते.
  • एका सॅटेलाइट ट्रॅकरला ते महाकाय चीनी रॉकेट सेकंदाला ४ मैल वेगाने पृथ्वीकडे जात आहे, असे आढळले. तेव्हा त्याने सावध केले.
  • गेल्या गुरुवारीच चीनने या रॉकेटच्या सहाय्याने बांधण्यासाठी आपल्या अंतराळ स्थानकाचा पहिला भाग पाठविला होता.
  • या मॉड्यूलचे नाव टियान आहे.
  • रॉकेटचा हा मुख्य भाग १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद होता.
  • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चिनी रॉकेटचा मोठा भाग पृथ्वीच्या वातावरणात जळेल परंतु त्याचे बरेच अवशेष पृथ्वीवर कोठेही कोसळू शकण्याची भीती होती.
  • चीनमधील रॉकेट अवकाशात अनियंत्रित होण्याची ही पहिली वेळ नव्हती.
  • आता अनियंत्रित झालेले रॉकेट न्यूयॉर्क, माद्रिद किंवा बीजिंग शहरात कोठेही कोसळू शकेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.
  • सुदैवाने या चीनी रॉकेटचा मार्ग हा भारताच्या बाहेरून जाणारा असल्याने सध्यातरी आपल्याला धोका नव्हता.
  • तज्ज्ञांच्या मते असे अवशेष हे प्रामुख्याने महासागरांमध्ये कोसळतात, आज नेमके तसेच झाले.
  • ४२ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या स्कायलॅबमुळेही अशीच घबराट माजली होती.

 

चीनने जगासाठी निर्माण केलेला हा नवा महाधोका कसा होता, हे समजून घेण्यासाठी पुढील दोन लिंक क्लिक करा आणि जाणून घ्या:

 

बातमी -१

कोरोनानंतर पृथ्वीसाठी चीनचे नवे संकट! कुठेही कोसळू शकते अनियंत्रित झालेले २१ टनी रॉकेट!!

 

बातमी -२

चीनची अंतराळात राज्य करण्याची महत्वाकांक्षी मोहीम आहे तरी कशी?


Tags: chinachina rocketlong march 5 Bचीनचीनी रॉकेटलाँग मार्च ५ बी
Previous Post

“…योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?” जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल

Next Post

‘लॅंसेट’: भारतातील कोरोनासाठी मोदी सरकार जबाबदार! संकटाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष भोवले!

Next Post
lancet

'लॅंसेट': भारतातील कोरोनासाठी मोदी सरकार जबाबदार! संकटाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष भोवले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!