मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकटानंतर चीनच्या ‘लाँग मार्च 5 बी’ या महाकाय रॉकेटमुळे संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. अनियंत्रित झालेले हे रॉकेट अखेर पृथ्वीवर कोसळले आहे. आज सकाळी या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळले आहेत. चीनी माध्यमांनुसार ‘लाँग मार्च 5 बी’ रॉकेटचे काही अवशेषांनी बीजिंगमधील वेळेनुसार (०२२४ जीएमटी) सकाळी १०:२४ वाजता वातावरणात प्रवेश केला आणि ते एका ठिकाणी कोसळले. भारताच्या दक्षिण-पूर्व आणि श्रीलंका – मालदिवजवळच्या सागरी परिसरात ते कोसळले आहे तर बहुतेक अवशेष वातावरणात प्रवेश करतानाच जळून गेले.
२९ एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट लॉँच करण्यात आले. स्पेस स्टेशन बांधण्यासाठी हे रॉकेट अंतराळात साहित्य घेऊन जात होते. हे रॉकेट एका मॉड्यूलर स्पेस स्टेशनपर्यंत गेलं. त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे रॉकेटवरील नियंत्रण गमावले
गेले. तेव्हापासून ते पृथ्वीवर कोसळून हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अखेर ते समुद्रात कोसळले आहे.
चीनचे महाकाय रॉकेट, पृथ्वीला कसा होता महाधोका?
- चीनने ‘लाँग मार्च ५ बी’ रॉकेट त्यांच्या अवकाश मोहिमेंतर्गत गुरुवारी प्रक्षेपित केले होते.
- या रॉकेटने अंतराळ स्थानकाचे भाग नेण्यात आले होते.
- त्यानंतर ते रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले होते.
- एका सॅटेलाइट ट्रॅकरला ते महाकाय चीनी रॉकेट सेकंदाला ४ मैल वेगाने पृथ्वीकडे जात आहे, असे आढळले. तेव्हा त्याने सावध केले.
- गेल्या गुरुवारीच चीनने या रॉकेटच्या सहाय्याने बांधण्यासाठी आपल्या अंतराळ स्थानकाचा पहिला भाग पाठविला होता.
- या मॉड्यूलचे नाव टियान आहे.
- रॉकेटचा हा मुख्य भाग १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद होता.
- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चिनी रॉकेटचा मोठा भाग पृथ्वीच्या वातावरणात जळेल परंतु त्याचे बरेच अवशेष पृथ्वीवर कोठेही कोसळू शकण्याची भीती होती.
- चीनमधील रॉकेट अवकाशात अनियंत्रित होण्याची ही पहिली वेळ नव्हती.
- आता अनियंत्रित झालेले रॉकेट न्यूयॉर्क, माद्रिद किंवा बीजिंग शहरात कोठेही कोसळू शकेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.
- सुदैवाने या चीनी रॉकेटचा मार्ग हा भारताच्या बाहेरून जाणारा असल्याने सध्यातरी आपल्याला धोका नव्हता.
- तज्ज्ञांच्या मते असे अवशेष हे प्रामुख्याने महासागरांमध्ये कोसळतात, आज नेमके तसेच झाले.
- ४२ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या स्कायलॅबमुळेही अशीच घबराट माजली होती.
चीनने जगासाठी निर्माण केलेला हा नवा महाधोका कसा होता, हे समजून घेण्यासाठी पुढील दोन लिंक क्लिक करा आणि जाणून घ्या:
बातमी -१
कोरोनानंतर पृथ्वीसाठी चीनचे नवे संकट! कुठेही कोसळू शकते अनियंत्रित झालेले २१ टनी रॉकेट!!
बातमी -२
चीनची अंतराळात राज्य करण्याची महत्वाकांक्षी मोहीम आहे तरी कशी?