Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘राईट टू प्ले’ : राज्यात १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’ साजरा होणार

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
बाल-सप्ताह-साजरा-करण्याबाबत-बैठक-1-1140x570

मुक्तपीठ टीम

बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी १४ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान राज्यात ‘बाल सप्ताह’ साजरा करणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.

आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वरळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबईत हा सप्ताह राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव उदय जाधव, मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, युनिसेफच्या कार्यक्रम अधिकारी सायली मोहिते आदी उपस्थित होते.

बाल सप्ताहाविषयी माहिती देतांना श्रीमती शहा म्हणाल्या की, बाल दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी ‘बाल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. बालकांसाठी ‘राईट टु प्ले’ (खेळण्याचा अधिकार) हा या सप्ताहाची संकल्पना (थीम) असणार आहे. हा सप्ताह युनिसेफच्या सहकार्याने आयोजित केला जाणार आहे. राज्यातील बालकांच्या विशेषत: बालगृह आणि सीसीएफच्या मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या बालकांमध्ये खेळाबाबत प्रचंड इच्छाशक्ती असून त्यांना संधी देण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘बाल सप्ताह’ कार्यक्रम राबवून मुलांसाठी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे श्रीमती शहा यांनी सांगितले.

बाल सप्ताहाच्या माध्यमातून मुलांना चांगली संधी मिळेल. राज्यातील मुलांसाठी एकत्र मिळून बालस्नेही महाराष्ट्र घडवू या, असे आवाहनही आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शहा यांनी यावेळी केले.


Tags: ‘बाल सप्ताह’‘राईट टू प्ले’Childrens weekgood newsGood news MorningMaharahstraRight To PlaySushilaben Shahगुड न्यूज मॉर्निंगबाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा
Previous Post

एसटीच्या५९०कर्मचाऱ्यांची, दिवाळी अंधारात तात्काळ हस्तक्षेपाची मुख्यमंत्र्यांना विनंती

Next Post

अनुपालन ओझे कमी करताना स्वच्छता, सुशासन आणि जीवनमान सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम २.०

Next Post
Special Campaign 2.0

अनुपालन ओझे कमी करताना स्वच्छता, सुशासन आणि जीवनमान सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम २.०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!