Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाविरोधात नवं पाऊल, आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलं होणार लसवंत!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
vaccine

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्याही पुन्हा वाढू लागलीय. अशा परिस्थितीत हा धोका टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करणे हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी, मुलांना लसवंत करण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. लहान मुलांसाठी लसीच्या डोससाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

 

लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे की, “मुले सुरक्षित असतील तर, देशाचे भविष्य सुरक्षित आहे! नव वर्षानिमित्ताने १५ ते १८ वयोगटातील मुलांची लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू आहे.”

 

आतापर्यंत ३.१५ लाख मुलांची नोंदणी

  • १ जानेवारी २०२२ रोजी, रात्री ११.३० वाजेपर्यंत १५ ते १८ वयोगटातील ३ लाखांहून अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.
  • या मुलांचे आजपासून म्हणजेच ३ तारखेपासून लसीकरण करणे सुरू होईल.

 

मुलांसाठी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मर्यादित असणार

  • केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळवले आहे की १५ ते १८ वयोगटातील मुलांना सध्या भारत बायोटेक कंपनीद्वारे निर्मित ‘कोव्हॅक्सिन’चा डोस दिला जाईल.
  • केंद्र सरकारच्या अधिकृत अंदाजानुसार, या वयोगटातील अंदाजे १० कोटी मुले लसीकरणासाठी पात्र आहेत.
  • १ जानेवारी २०२२ पासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे.
  • याशिवाय आजपासून तुम्ही लसीकरण केंद्रावरही जाऊन थेट नोंदणी करू शकता.

 

२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलंही लसीसाठी पात्र

२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या मुलांनाच सध्या कोरोनाची लस दिली जाईल, अशी माहिती सरकारकडून वयाबद्दल देण्यात आली आहे. ही लस १५ वर्षाखालील मुलांना दिली जाणार नाही. लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतरच दिला जाईल.

 

नोंदणीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या

  • १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीचा स्लॉट बुक करण्यासाठी, प्रथम कोविन अॅपवर नोंदणी करावी लागेल.
  • तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करावे लागेल. लस बुक करण्यासाठी मुलांचा फोटो प्रमाणपत्र देखील आवश्यक असेल. यानंतर तुम्ही स्लॉट बुक करू शकाल.
  • तरुण मुलांकडे मतदार ओळखपत्रासारखी कागदपत्रे नसल्यास आधार कार्डाचा वापर केला जाईल.
  • शाळेच्या ओळखपत्रासह लसीचा स्लॉट देखील बुक केला जाईल.
  • ज्या मुलांकडे मोबाईल नाही, ते पालकांच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करू शकतात. नियमानुसार एका मोबाईलवरून ४ जणांची नोंदणी करता येते.
  • केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी निर्धारित सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. लसीकरणाचा परिणाम पाहण्यासाठी मुलांना अर्धा तास निरिक्षणात ठेवण्यात येईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Corona patientCovaxineCowin Portalgood newsgovernmentmuktpeethvaccinatedVaccination of childrenकोरोना रुग्णकोविन पोर्टलकोव्हॅक्सिनगुड न्यूजमुक्तपीठमुलांचे लसीकरणलसवंतसरकार
Previous Post

२०२१मध्ये १६८ नवे विमान मार्ग! सिंधुदुर्ग ओरोससह ३ नव्या विमानतळांचे उद्घाटन!!

Next Post

महिंद्रा स्कॉर्पिओही बदलतेय, अपडेटेड व्हर्जनमध्ये आधुनिक सुविधा!

Next Post
Mahindra

महिंद्रा स्कॉर्पिओही बदलतेय, अपडेटेड व्हर्जनमध्ये आधुनिक सुविधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!