Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 13, 2021
in सरकारी बातम्या
0
कोकण आणि विदर्भातील जलसिंचन प्रकल्पासंदर्भात बैठक 1

मुक्तपीठ टीम 

 

राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्यायोगे सिंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

 

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अडीअडचणी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या उपाययोजना यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते.

 

बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव (जलसंपदा), विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे व इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थ‍ित होते. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प संदर्भात पुर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडीअडणींबाबत निधी, पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

त्या ठिकाणचे असलेले प्रश्न मार्गी लावत असतानाच प्रकल्प पुर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. गोसेखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प, मागील काळात त्यामध्ये आलेले अडथळे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. ते प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असेही ठाकरे म्हणाले.

 

जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेवून त्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून ते पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पुर्ण होऊन राज्यातील ओलीत क्षेत्र वाढेल असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पूर्ण करावा, अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

 

यावेळी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई व कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माटे यांनी सादरीकरण करुन येथील प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.

 

करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पुर्ण होऊन राज्यातील ओलीत क्षेत्र वाढेल असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पूर्ण करावा, अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

 

यावेळी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई व कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माटे यांनी सादरीकरण करुन येथील प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.


Tags: गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पजलसिंचन प्रकल्पमुक्तपीठविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
Previous Post

कडक सुरक्षा…वेगवान वाहतूक…मुंबईत कोरोना लस पोहचली!

Next Post

लवकरच टीआरपी सुरु होणार, पण गणितं बदलणार!

Next Post
Prakash Javadekar

लवकरच टीआरपी सुरु होणार, पण गणितं बदलणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!