Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना! शिवप्रेमींमध्ये वाढता संताप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bangalore

मुक्तपीठ टीम

कर्नाटकच्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महारांज्याच्या पुतळ्यावर काळा रंग ओतल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अधम कुकृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच सर्वत्र कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. बेळगावसह कोल्हापुरात रात्रीपासूनच निषेध नोंदवण्यात येत आहे. कोल्हापुरातील शिवप्रेमींनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे.

 

शिवप्रेमी रस्त्यावर उतरले!

  • बंगळुरूतील घटनेच्या निषेधासाठी बेळगाव शहरात गुरुवारी धर्मवीर संभाजीराजे चौकात शेकडो मराठी शिवप्रेमी जमले होते.
    बेळगावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे.
  • पोलिसांनी शहरात १४४ कलम लागू केलं आहे.
  • रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत कलम १४४लागू असणार आहे.
  • रस्त्यावर उतरून घोषणा देणाऱ्या शिवप्रेमींना कर्नाटक पोलिसांनी अटक केली.
  • त्यांना बेळगाव न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.
  • आंदोलकांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे आणि शंकर पाटील यांनी बाजू मांडली.

 

अटकेच्या निषेधार्थ महिलांचे आंदोलन

  • बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींवर कारवाई झालेली नाही, मात्र निषेध करणाऱ्या शिवप्रेमींना कर्नाटक पोलीस तुरुंगात डांबत आहेत.
  • त्यामुळे बेळगाव आणि सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.
  • बेळगावातील शिवाजी उद्यानात निषेध मोर्चा काढण्यासाठी जमलेल्या लोकांना पोलिसांनी रोखले.
  • पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, तेथेच महिलांनी ठिय्या आंदोलन केले.
  • अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी करण्यात आली.

 

कोल्हापूरात घटनेचे पडसाद

  • महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरली.
  • त्यांनी कर्नाटकचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
  • युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरीतील कन्नड व्यावसायिकांची हॉटेल बंद केली.
  • त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे.
  • त्यानंतर बेळगावमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  • त्यामुळे बेळगावला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

 

संजय राऊत

दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते..
हे चित्र बेंगळुरू येथील आहे..
धिक्कार!धिक्कार!
उठ मराठ्या ऊठ!!

 

एकनाथ शिंदे

कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.

कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं.

मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.

 

अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ही विकृती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर याबाबत सरकारने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारशी बोलणी करावी असेही ते म्हणाले आहेत.


Tags: BangluruChhatrapati Shivaji MaharajKolhapurकोल्हापूरछत्रपती शिवाजी महाराजबंगळुरू
Previous Post

“परीक्षांचा धंदा आणि बेरोजगारीचा गळफास”

Next Post

गरीबांसाठीच्या धान्याचा काळाबाजार! मुंबईतील वीस जणांची टोळी जेरबंद, २५ लाखाचे धान्य जप्त!

Next Post
rice

गरीबांसाठीच्या धान्याचा काळाबाजार! मुंबईतील वीस जणांची टोळी जेरबंद, २५ लाखाचे धान्य जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!