मुक्तपीठ टीम
सचिन तेंडुलकर म्हटलं की क्रिकेटचा देव असं आपसूकच ओठी येतं. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नव्यानव्या विक्रमांसह यशाची शिखरं गाठली आहेत. अलिकडेच सचिन तेंडुलकरने एका चर्चेत सहभागी होत आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील संघर्षाबद्दल काही माहिती उघड केली. कोणत्याही माणसाला कोणत्याही माणसाकडून शिकता येते, हे सांगिताना सचिनने स्वत:सोबत चेन्नईच्या हॉटेलमध्ये घडलेली एक घटना सांगितली.
कर्मचाऱ्याचा सल्ला…फलंदाजीत सुधारणा
- सचिनने सांगितले की, चेन्नईतील एका हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने माझ्या खोलीत डोसा आणला आणि टेबलावर ठेवला.
- त्यावेळी त्या कर्मचाऱ्याने, “सामन्यादरम्यान तुमच्या एल्बो गार्डमुळे बॅट पूर्ण हालचाल करीत नव्हती” असे म्हटले, ती खरी गोष्टी होती.
- त्याने ते सांगितल्यामुळे मला त्यानंतर त्या समस्येतून बाहेर पडण्यास मला मदत केली.
- त्या कर्मचाऱ्याच्या सल्ल्याने माझ्या फलंदाजीत लक्षणीय सुधारणा झाली, असे सचिनने म्हटले.
सुरुवातीची १० ते १२ वर्ष तणावात
- सचिनने सांगितले की, क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीचे १० ते १२ वर्ष प्रचंड तणावाखाली होतो.
- बऱ्याच वेळी असे ही झालं की, सामन्यांच्या आधी रात्री झोप येत नसत.
- पण त्यातून स्वत:ला समजवण्यास सुरुवात केली की, हा पण माझ्या तयारीचाच एक भाग आहे.
- वेळेनुसार त्या गोष्टीला मी स्वीकारण्यास सुरुवात केली.
- तसेच रात्री झोप येत नसल्याने डोक शांत ठेवण्याासाठी इतर गोष्टींमध्ये मन लावायचो.