मुक्तपीठ टीम
यंदाची दिवाळी ही धुमधडाक्याची… कोरोना महामारीच्या २ वर्षानंतर यावर्षीची दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. या दिवाळीच्या सणाला अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू किंवा बोनस देत आहेत. पण जरा, विचार करा की तुम्हाला भेटवस्तूत किंवा बोनसमध्ये एखादी कार किंवा बाईक दिली तर… होय, असाच काहीसा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.
चेन्नईतील चालानी ज्वेलरी मार्टचे मालक जयंती लाल यांनी हे केलं आहे. या व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बाईक आणि कार गिफ्ट केली आहे. हा बोनस मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. तर काहींच्या डोळ्यात पाणी आले. चालानी ज्वेलरी मार्टच्या मालकाने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक भेट दिली. त्यानंतर आता त्यांचा हा औदार्य चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी १० कर्मचाऱ्यांना कार आणि २० कर्मचाऱ्यांना बाईक भेट दिली आहे.
या औदार्यतेवर काय म्हणाले जयंती लाल?
- चेन्नईतील चालानी ज्वेलरी मार्टचे मालक जयंती लाल देखील या खास प्रसंगी भावूक झाले, त्यांनी सांगितले की, माझ्या कर्मचार्यांनी माझ्या चढ-उतारात मला साथ दिली आहे.
- आम्ही १० जणांना कार आणि २० जणांना बाईक देत आहोत. . चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
- ते पुढे म्हणाले की, हे सर्व माझे कर्मचारी नसून एका कुटुंबासारखे आहेत, म्हणूनच मी त्यांना हे सरप्राईज गिफ्ट दिले आहे आणि प्रत्येक बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांशी असे वागले पाहिजे.