मुक्तपीठ टीम
आपल्या लाडक्या टॉम आणि जेरीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बालपणीच नाही तर अजूनही आपण सारे आवडीने पाहत असलेले कार्टून म्हणजे टॉम आणि जेरी. आजही त्यांनी आपले स्थान लोकांच्या मनात कायम राखलेले आहे. आता त्यांचा नवा चित्रपट आला आहे. हा चित्रपट देशातील ६०० स्क्रीनवर इंग्रजी आणि चार भारतीय भाषांमध्ये रिलीज झाला आहे.
हॉलिवूडची लाइव्ह अॅक्शन अॅनिमेशन फिल्म ‘टॉम अॅन्ड जेरी’ हा प्रदर्शित झाला आणि चांगलं यश मिळालं. वॉर्नर ब्रदर्सच्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय कार्टून पात्र बिल्ला टॉम आणि रॅट जेरी मोठ्या पडद्यावर धमाल करत आहेत. भारतातील नामांकित फिल्म ट्रेड एक्स्पर्ट गिरीश वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅनिमेशन चित्रपट सर्वांनाच आवडतात. भारतात आजवर अशा अॅनिमेटेड चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. मग ते गणेश, घटोत्कच किंवा बाल गणेश असो. तसेच टॉम आणि जेरीसारखे हॉलीवूड चित्रपट तर बजेट आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे आहेत.
टॉप अँड जेरीने चित्रपट गृहांचा गल्लाही खूश
o मोठ्या सिनेमाच्या रिलीजच्या प्रतीक्षेतील चित्रपटगृहांना या चित्रपटामुळे मोठा दिलासा मिळाला.
o इंग्रजी व चार भारतीय भाषांमध्ये देशातील ६०० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाची सुरूवात चांगली आहे.
o चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच मुंबईत अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली.
o सुरुवातीच्या दिवशी अॅडव्हान्स बुकिंग पूर्ण भरलेले होते. बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
o अॅनिमेशन हा एक विभाग आहे जो प्रत्येकाला आवडतो.
पाहा व्हिडीओ: