Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परबांवर गुन्हा, शिवसेनेसाठी ऐन धामधुमीच्या काळात नवं संकट!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil Parab

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या राजकारणातील धामधूम कमालीची वाढली आहे. शिवसेनेतीलच नाही तर एकंदरीच राजकारणातील संघर्षाची धग वाढत चालली आहे. त्याचवेळी शिवसेनेवर एक नवं संकट ओढवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब आणि इतर काही जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती.

रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल!!

  • दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
  • या गुन्ह्यात पोलिसांनी अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि ३४ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
  • भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
  • सोमय्यांनी म्हटले आहे की, अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी सरकारने ९ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. महिनाभरात ठेकेदाराची नियुक्ती करुन पुढील ९० दिवसांत हे रिसॉर्ट पाडण्यात येईल.

अनिल परबांवर काय आहे आरोप?

  • अनिल परब यांचा रत्नागिरीतील दापोली रिसॉर्ट हा अनधिकृत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी वारंवार केला आहे.
  • पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधण्यात आला आहे, असा आरोप सोमैय्या यांनी केला आहे.
  • सीआरझेडचे उल्लंघन करून हा रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधला आहे.
  • तसे पुरावे देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.
  • महसूल, पर्यावरण व जिल्हाधिकारी यांच्या विभागाकडून अनिल परब यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.
  • अनिल परब यांना एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. तरीसुद्धा अजूनही ४ प्रकरणे शिल्लक आहेत, असे सांगत परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमैय्या यांनी केली होती.

शिवसेनेवर नवे संकट का?

  • अनिल परब हे फक्त एक शिवसेना आमदार नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक आहेत.
  • शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्रापासून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या परब यांनी पार पाडल्या आहेत.
  • शिवसेनेसाठी कायदेशीर लढाया लढण्यासाठी अनिल परब मोठी भूमिका बजावतात.
  • मुंबई मनपाच्या राजकारणाची मतदारसंघनिहाय माहिती असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अनिल परब आहेत.
  • अनिल परब यांच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर संकट आले तर शिवसेनेसाठी मुंबई मनपाच्या निवडणुका लढवताना त्रास होऊ शकतो.

Tags: Anil ParabDapoliDapoli Sai Resort CaseKirit SomaiyaShivsenaअनिल परबकिरीट सोमय्यादापोलीशिवसेनासाई रिसॉर्ट प्रकरण
Previous Post

एसएनडीटी विद्यापीठात आज महा विधी सेवा शिबीराचे आयोजन

Next Post

राज्यातील प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने सहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
एडीबी बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मा.मुख्यमंत्री यांची भेट 1

राज्यातील प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने सहाय्य करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!