मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या राजकारणातील धामधूम कमालीची वाढली आहे. शिवसेनेतीलच नाही तर एकंदरीच राजकारणातील संघर्षाची धग वाढत चालली आहे. त्याचवेळी शिवसेनेवर एक नवं संकट ओढवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब आणि इतर काही जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती.
रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल!!
- दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- या गुन्ह्यात पोलिसांनी अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि ३४ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
- सोमय्यांनी म्हटले आहे की, अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी सरकारने ९ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. महिनाभरात ठेकेदाराची नियुक्ती करुन पुढील ९० दिवसांत हे रिसॉर्ट पाडण्यात येईल.
अनिल परबांवर काय आहे आरोप?
- अनिल परब यांचा रत्नागिरीतील दापोली रिसॉर्ट हा अनधिकृत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी वारंवार केला आहे.
- पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधण्यात आला आहे, असा आरोप सोमैय्या यांनी केला आहे.
- सीआरझेडचे उल्लंघन करून हा रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधला आहे.
- तसे पुरावे देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.
- महसूल, पर्यावरण व जिल्हाधिकारी यांच्या विभागाकडून अनिल परब यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.
- अनिल परब यांना एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. तरीसुद्धा अजूनही ४ प्रकरणे शिल्लक आहेत, असे सांगत परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमैय्या यांनी केली होती.
शिवसेनेवर नवे संकट का?
- अनिल परब हे फक्त एक शिवसेना आमदार नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक आहेत.
- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्रापासून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या परब यांनी पार पाडल्या आहेत.
- शिवसेनेसाठी कायदेशीर लढाया लढण्यासाठी अनिल परब मोठी भूमिका बजावतात.
- मुंबई मनपाच्या राजकारणाची मतदारसंघनिहाय माहिती असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अनिल परब आहेत.
- अनिल परब यांच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर संकट आले तर शिवसेनेसाठी मुंबई मनपाच्या निवडणुका लढवताना त्रास होऊ शकतो.