Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जिप पोटनिवडणुकीतही भाजपाचा पहिला क्रमांक कायम, कार्यकर्त्यांचे अभिनंदन”

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

October 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
chandrakant patil

मुक्तपीठ टीम

राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्याबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला तरीही मतदारांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात सत्तेवर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता व भाजपा विरोधी पक्ष असला तरीही तोच ट्रेंड आज कायम राहिला आहे.

 

त्यांनी सांगितले की, राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती करून पूर्ण बहुमताने विजय मिळविला. त्यानंतर विरोधी पक्षात बसावे लागले तरीही भाजपाला जनतेचा पाठिंबा टिकून आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिडवणुकीत भाजपाला विजय मिळाला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आगामी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकतही भाजपा विजयी होईल याचा आपल्याला विश्वास आहे.

 

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याने न्यायालयाने या ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द केली होती आणि मतदारांवर पोटनिवडणुकीची वेळ आली. या जागा खुल्या झाल्या तरीही ओबीसी उमेदवार देऊन भाजपाने आपली बांधिलकी पाळली. मतदारांनी भाजपाला सर्वाधिक जागांवर विजयी करून पक्षाला पाठिंबा दिल्याचे निकालावरून दिसते. आपण मतदारांचे भाजपातर्फे आभार मानतो.

 


Tags: BJPBy-electionchandrakant patilCongressNCPOBC political reservationShivsenaZP Electionsओबीसी राजकीय आरक्षणकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या घटल्या!

Next Post

“बेशिस्तपणासाठी विद्यार्थ्यांना दटावण्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं म्हणता येणार नाही”

Next Post
SC

"बेशिस्तपणासाठी विद्यार्थ्यांना दटावण्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं म्हणता येणार नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!