Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेमडेसिविर उपलब्धता वाढण्यासाठी प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

April 23, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
chandrkant patil

मुक्तपीठ टीम

कोरोनावर नियंत्रण मिळवताना ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्या उपचारासाठी केअर सेंटर उभारणीसह बाधितांना रुग्णालयांत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पाठपुराव्यानंतर पुणे महानगरपालिका संचालित एस.एन.डी.टी महाविद्यालयात सहाव्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी २५० रुग्ण विलिनीकरणात ठेवण्यात येतील. या लोकार्पणानंतर ते माध्यामांशी बोलत होते. तसेच, रेमडेसिविर उपलब्धता वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, सभागृह नेते  गणेश बिडकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, मनपा उपायुक्त राजेंद्र मुठे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, नगरसेवक सुशिल मेंगडे, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, वृषाली चौधरी, मिताली सावळेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, राजेंद्र येडे, बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड.प्राची बगाटे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळवताना ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यावर उपचारासाठी सेंटर उभी करत असताना, ऑक्सिजन बेड वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पण त्याबरोबरच जे बाधित आहेत, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

विरारमधील दुर्घटनेवर बोलताना  पाटील म्हणाले की, कोणत्याही चौकशीशिवाय यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. कोरोनामध्ये काम करणारा कर्मचारी हा जिवावर उदार होऊन काम करत आहे. त्यामुळे एखादी चूक नक्की तांत्रिक कारणामुळे झाली की, ह्यूमन एअररमुळे ही चूक झाली, हे शोधायला लागेल. यातून अशा घटना पुन्हा होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रेमडेसीवीरच्या विषयावर बोलताना श्री पाटील म्हणाले की, सध्या राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही डिस्ट्रिब्यूटर अॅडव्हान्स पेमेंट शिवाय रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यास नकार देत आहेत. त्याचा परिणाम रुग्णांवरील उपचारांवर होत आहे. त्यामुळे जे डिस्ट्रिब्यूटर अॅडव्हान्स पेमेंट घेतल्याशिवाय रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवतील, त्यांना मी पुढाकार घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून पैसे मिळवून देऊ, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसीवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही, आणि रुग्णांवर योग्यवेळी उपचार होऊन, ते बरे होतील.


Tags: chandrakant patilremdesivir injectionकोरोनाप्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलमंजुश्री खर्डेकररेमडेसिविर
Previous Post

अखेर शिरगाववासियांना दिलासा, पुलासाठी ३३ कोटी ८७ लाखांचा निधी

Next Post

कॅडिलाच्या विराफिन औषधाने एका आठवड्यात कोरोना बरा! उपचारासाठी मान्यता!

Next Post
BIG Good News

कॅडिलाच्या विराफिन औषधाने एका आठवड्यात कोरोना बरा! उपचारासाठी मान्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!