Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर शिरगाववासियांना दिलासा, पुलासाठी ३३ कोटी ८७ लाखांचा निधी

April 23, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
jayant patil

मुक्तपीठ टीम

अखेर गेल्या अनेक वर्षांपासूनची शिरगाववासियांची कृष्णा नदीवरील पुलाची मागणी पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण होणार असून शिरगाववासियांनी पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत.

कृष्णा नदीला पूर आल्यानंतर शिरगाववासियांचा तालुक्याशी संपर्क तुटत होता. पूरपरिस्थितीत येणाऱ्या अडचणी शिरगाववासियांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडल्या होत्या. शिवाय सांगली जिल्हयात महापूर आला होता तेव्हा खुद्द जयंत पाटील यांना शिरगाववासियांपर्यंत मदत पोचवताना अडचणी आल्या होत्या.

इस्लामपूर – वाळवा मतदारसंघातील शिरगाव हे एकमेव गाव कृष्णा नदीच्या पल्याड आहे. पावसाळ्यात तेथील नागरिकांना दळणवळणाच्यादृष्टीने प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळेच पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांच्या पुलाच्या मागणीचा केंद्राकडे पाठपुरावा केला आणि आता केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत या मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. महापुराच्यावेळी आलेल्या कटू आठवणी उराशी बाळगत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आता समाधानही व्यक्त केले आहे.

याशिवाय केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत आष्टा – दुधगाव – कुंभोज पुलापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही ३.९६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आष्टा – दुधगाव परिसराचा थेट कोल्हापूर जिल्हयाशी दळणवळणासाठी संबंध येणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

jayant patil


Tags: jayant patilkrushna riverकृष्णा नदीजंयत पाटीलशिरगाव
Previous Post

विरार आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, जखमींना १ लाख सरकारी मदत

Next Post

रेमडेसिविर उपलब्धता वाढण्यासाठी प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

Next Post
chandrkant patil

रेमडेसिविर उपलब्धता वाढण्यासाठी प्रयत्न करणार - चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!