Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेची तयारी”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान

June 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
chandrakant patil

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा आरक्षण गमावले असून त्याबाबत कॅमेऱ्यांसमोर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे आव्हान आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

 

मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण हे दोन्ही गमावण्याच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या राज्य सरकारचाच दोष आहे, असे त्यांनी सांगितले.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत किती बेफिकीरी केली आणि किती दिरंगाई केली हे सर्वोच्च न्यायालयाच्या सुमारे सातशे पानी निकालात पानोपानी दिसते. या विषयावर आपली कागदपत्रांसह जाहीर चर्चेची तयारी आहे.

 

त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत ढिलाई केली. देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविले. परंतु नंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मागास आयोगाचा आग्रह आहे आणि त्यांना आरक्षणाच्या प्रमाणाचा आधार हवा आहे, ते ही काम महाविकास आघाडी सरकारने केले नाही.

 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करून जनतेचे प्रश्न मार्गी लावले. त्यांनी भाजपाला जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा मंत्र दिला. भाजपा हा संघर्ष कधीच थांबविणार नाही. अन्यायाविरुद्ध आणि वंचितांसाठी भाजपा नेहमीच संघर्ष करत राहील.


Tags: chandrakant patilMaratha ReservationOBC reservationओबीसी आरक्षणदेवेंद्र फडणवीसभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलभाजपामराठा आरक्षणमहाविकास आघाडी सरकार
Previous Post

“न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर तरी केंद्र अॅम्फोटेरीसिन-बी औषध देणार का?”

Next Post

“उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा मानाने फडकेल!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा मानाने फडकेल!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!