Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर तरी केंद्र अॅम्फोटेरीसिन-बी औषध देणार का?”

काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अतुल लोंढेंचा मोदी सरकारला सवाल

June 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
atul londhe

मुक्तपीठ टीम

कोरोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रुप धारण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. पहिले रेमडेसीवीरचा घोळ घातला त्यानंतर लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. नागपूर खंडपीठानेही अॅम्फोटेरीसिन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.

 

म्युकरमायकोसीसच्या आजाराने नागपुरमध्ये लोक मरत आहेत, राज्यावर जबाबदारी ढकलू नका, औषध उपलब्ध का करुन द्या असे सुनावले. औषधांअभावी लोक तडफडून मरत आहेत तरीही मोदींना पाझर फुटत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

 

मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेताना लोंढे म्हणाले की, कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसीस रोगाने लोक त्रस्त आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु या आजारावर उपयोगी असलेल्या अॅम्फोटेरीसिन-बी औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. यावरून नागपूर खंडपीठाने मोदी सरकारला सुनावले पण मोदी सरकारवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. मोदी सरकारकडे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही. कोर्टात फक्त तोंडी माहिती देता, वरून हे कोर्टाचे काम नाही असे कोर्टालाच सांगता हे अत्यंत बेजबाबदार व बेफिकीरपणाचे लक्षण आहे.

 

नागपूर शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, किमान त्याचे भान ठेवून तरी नागपूरच्या जनतेला कोरोना संकटकाळात योग्य त्या सुविधा पुरवण्याकडे लक्ष देतील अशी नागपूरकरांची अपेक्षा होती पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोदी नागपूरवर कोणता सूड उगवत आहेत, असा सवाल जनता विचारू लागली आहे. औषधे पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे या जबाबदारीतून पळ काढू नका. अॅम्फोटेरीसिन-बी औषध नागपूरला उपलब्ध करुन द्या, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.


Tags: Atul LondheCongressnagpurprime minister narendra modiअतुल लोंढेअॅम्फोटेरीसिन-बीकेंद्र सरकारनागपूर महानगरपालिकापंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

पदोन्नती आरक्षणासाठी मुलुंड तहसीलदार कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन

Next Post

“मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेची तयारी”

Next Post
chandrakant patil

"मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेची तयारी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!