मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा वक्तव्य केल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलचं पेटून उठलं आहे. सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले…
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
- सुप्रियाताई सुळे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे.
- नरेंद्र मोदींच एवढंच म्हणणं आहे की, कोरोनाच्या आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला.
- त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झालीआणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला.
- महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषय नाही.
- महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले.
- महाराष्ट्र शासनाने काय दिल याची श्वेतपत्रिका जाहीर करा.
लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता….
- सुप्रियाताईंनी किती ही केविलवाणी धडपड केली.
- बाळासाहेब थोरात तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना चांगलं माहीत आहे.
- फिल्डवर भाजपाचे कार्यकर्ते होते.
- योजना केंद्राच्या होत्या तुम्ही काय दिल?
- लॉकडाऊन मध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे मोदींनी भरून काढलं.
- रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची.
- लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता.
- आम्ही तुमची काळजी घेऊ, आम्ही तुमचं पोट भरू हा आत्मविश्वास तुम्ही परप्रांतीय लोकांना देऊ शकला नाही हे तुमचं अपयश आहे.