Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपाच जिंकेल”

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आत्मविश्वास

March 19, 2022
in घडलं-बिघडलं
0
Chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत उपोषण केले, त्यावेळी आघाडी सरकारने त्यांना आश्वासने दिली. आघाडी सरकार फसवणूक करेल असा इशारा आपण त्यावेळी दिला होता व आता तसे घडताना दिसत आहे. आघाडी सरकारने मराठा आरक्षण, शिक्षणात सवलत, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना अशा सर्व बाबीत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्याबद्दल समाजात संताप आहे. मराठा समाजाच्या फसवणुकीबद्दल आपण सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असून सरकारला प्रश्नांची उत्तरे मागत या विषयावर चर्चा घडविणार आहे.

 

ते म्हणाले की, या सरकारने केवळ मराठा समाजाचीच नव्हे तर ओबीसी, अनुसूचित जाती, धनगर अशा इतर समाजघटकांचीही फसवणूक केली आहे. एसटीच्या शंभर कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी या सरकारला पाझर फुटत नाही आणि सरकार एसटीचा संप मिटवत नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय भाजपाच्या दबावामुळे सरकारला स्थगित करावा लागला. तथापि, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एकूणच या सरकारबद्दल समाजाच्या सर्व घटकांमध्ये नाराजी आहे. या मुद्द्यांवर आम्ही मतदारांमध्ये जागृती घडवू आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेचा आशिर्वाद मिळवू.

 

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ईडीने अटक केलेले महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांची खाती काढून घेणे आणि पालकमंत्रीपद काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तथापि, ते पुरेसे नाही. नवाब मलिक यांना मंत्रिपद सोडावेच लागेल.

 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने सत्यजित कदम आणि महेश जाधव अशा दोन नावांची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला शिफारस केली असून पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय लवकरच पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल, अशी माहिती त्यांनी दिली.


Tags: Assembly by ElectionBJPchandrakant patilKolhapurKolhapur North Assembly by-electionकोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकचंद्रकांत पाटील
Previous Post

गुड न्यूज मॉर्निंग स्टार मृदुलाचा सन्मान!

Next Post

कोल्हापूर पोटनिवडणूक: मविआविरोधात भाजपाकडून सत्यजीत कदम!शिवसेना लढणार नसल्यानं भाजपाXकाँग्रेस!

Next Post
bjp & congress

कोल्हापूर पोटनिवडणूक: मविआविरोधात भाजपाकडून सत्यजीत कदम!शिवसेना लढणार नसल्यानं भाजपाXकाँग्रेस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!