मुक्तपीठ टीम
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन, जयपूर यांनी बी.डी.एस., एम.डेस आणि एम.व्होकेशन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २१ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. हे इन्स्टिट्यूट राजस्थान जयपूर येथे आहे.
कोर्स आणि स्पेशलायझेशनविषयी सविस्तर माहिती
- चार वर्षांच्या BEDS प्रोग्राममध्ये एकूण १८० जागा आहेत आणि हार्ड मटेरियल डिझाइन, सॉफ्ट मटेरियल डिझाइन, फायर्ड मटेरियल डिझाइन, फॅशन क्लोदिंग डिझाइन, ज्वेलरी डिझाइन, क्राफ्ट कम्युनिकेशन या स्पेशलायझेशन आहेत.
- वरील सर्व विषयांचा दोन वर्षांचा एमडेस प्रोग्राम देखील आहे. ज्यामध्ये एकूण ९० जागा आहेत.
- या संस्थेत वरील सर्व विषयांचा तीन वर्षांचा एम. व्होकेशनल कोर्सही चालवला जातो, या कोर्समध्येही ९० जागा आहेत.
प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता
- BEDS प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
- M.Des, B.Des, B.Arch, BA किंवा B.Sc in Design किंवा B.Vocation कोर्स किंवा ग्रॅज्युएशन इन डिझाईन किंवा आर्किटेक्चर पार्श्वभूमी आवश्यक आहे.
- नॉन-डिझाइन बॅकग्राउंडचे पदवीधर एम व्होकेशनसाठी अर्ज करू शकतात.
प्रवेशासाठी परीक्षेसंबंधित तपशील
- सर्व प्रोग्रामच्या प्रवेशासाठी, एक सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, जी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दोन भागात घेतली जाईल.
- पार्ट-ए मध्ये जनरल अवेअरनेस, क्रिएटिव्हीटी आणि पर्सेप्शन टेस्ट असेल, पार्ट-बी मध्ये मटेरियल, कलर/ कॉन्सेप्चुअल टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू असेल.
- परीक्षेचा अभ्यासक्रम आणि नमुना अधिसूचनेत तपशीलवार स्पष्ट केला आहे.
- पाटणा, कोलकाता, दिल्ली या शहरांसह देशभरातील १४ शहरांमध्ये ही चाचणी घेतली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज इन्स्टिट्यूटच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्टच्या https://www.iicd.ac.in/en/ या अधिकृत वेबसाइटवरून सर्व माहिती मिळवावी आणि अर्ज करावा.