मुक्तपीठ टीम
आताचा काळ हा फास्ट फुडचा आहे. फास्ट फुड मधील विगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्ये नेहमीच घेताना दिसतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे बर्गर. बर्गरचा जन्म परदेशात झाला असला, तरी हा परदेशी खाद्यपदार्थ भारतात देखील खुप प्रसिध्द आहे. बर्गर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मिळतो. पण पंजाबमध्ये बर्गरवर एक वेगळा आणि अचंबित करणारा प्रयोग करण्यात आला आहे. पंजाब येथील लुधियानामध्ये ‘बाबा जी बर्गर’ या विक्रेत्याकडे ‘व्हेज गोल्ड बर्गर’ हा बर्गरचा अनोखा प्रकार विकला जातो. सोन्याचे वर्क असलेल्या या बर्गरची किमंत १००० रु. आहे.
खवय्यांसाठी भव्य बर्गरची मेजवानी!
- ‘बाबा जी बर्गर’ येथे बर्गरवर अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.
- लुधियानाच्या मॉडेल टाऊन एक्स्टेंशनमध्ये गुरुद्वाराच्या बाहेर असलेल्या रस्त्यावरील हा विक्रेता आहे.
- या विक्रेत्याचे नाव बाबा दीप सिंह आहे.
- जिथे बर्गर आणि सँडविच खूप दिवसांपासून बनवले जात आहे.
- व्हेज गोल्ड बर्गरची किंमत १००० रु. आहे.
- या बर्गरमध्ये सोन्याचे वर्ख केले आहे.
- यासोबतच सुका मेवा, भाज्या, टिक्की यांचादेखील समावेश आहे.
‘व्हेज गोल्ड बर्गर’चा वेगळेपणा
- व्हेज गोल्ड बर्गर बनवणारे बाबा दीप सिंह यांनी बर्गर बनवण्यासाठी २० मिनिटे लागतात असे सांगितले.
- बर्गरची उंची १ फुटापर्यंत असते.
- बर्गरचे वजन १ किलोपर्यंत जाते.
- ड्रायफ्रुट्स, गोल्ड वर्ख, पनीर टिक्की, आलू टिक्की, ब्रोकोली, स्वीट कॉर्न, नूडल्स, पाच प्रकारचे सॉस, सलाड यांचा वापर करून बर्गर तयार केले जातात.
बाबा दीप सिंह यांनी दावा केला आहे की, जो कोणी पाच मिनिटात व्हेज गोल्ड बर्गर खाईल, त्याच्याकडून बर्गरचे पैसे घेतले जाणार नाहीत, उलट त्या व्यक्तीला १००० रु. दिले जातील. २ महिन्यांआधी हा बर्गर लाँच करण्यात आला आहे.