मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग येत्या शनिवारी मध्यरात्रीनंतर १.२० ते रविवारी दुपारी ३.२० वाजेपर्यंत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर लाईन विभागांवर मेगा ब्लॉक करणार आहे. त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल होणार आहेत.
येत्या २२ जानेवारी २२ (शनिवार) ते २३ जानेवारी २२ (रविवार) मध्यरात्रीपर्यंत ठाणे-दिवा विभागा दरम्यान मुख्य (मेन) मार्गावर वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा आहे. हे लक्षात घेऊन सर्व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वि•ाागीय वाणिज्य व्यवस्थापक (वर्क्स) टी. सुषमा यांनी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचे आणि एसटी महामंडळाला अतिरिक्त बससेवा या कालावधीत सुरु ठेवण्याचे आणि या विशेष सेवेवर संबंधित परिवहन अधिका-यांनाही नियुक्त करावे, अशी लेखी मागणी केली आहे. मध्य रेल्वेने महाराष्ट्र मंत्रालयातील नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांनाही याबद्दल अवगत केले आहे.
कल्याण- डोंबिवली परिवहन सेवेचे व्यवस्थापक दीपक सावंत, ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे आणि एस.टी महामंडळाचे उपाध्यक्ष/ व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ठाणे ते कल्याण दरम्यान अतिरिक्त बससेवा शनिवारी ते रविवारी दुपारपर्यंतच्या ब्लॉक कालावधीत सुरु ठेवाव्यात आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी, असे पत्रात म्हटले आहे.
मेगा ब्लॉकच्या वेळा
- सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर स. ११.४० ते ते दु. ४.४० पर्यंत
- चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप मार्गावर स. ११.१० ते दु. ४.४० पर्यंत.
- स. ११.१६ ते दु. ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी
- सीएसएमएटी टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी हार्बर सेवा आणि सीएसएमटीहून सुटणारी वांद्रे/गोरेगावकडे जाणारी हार्बर सेवा स. १०.४८ ते दु. ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.
- सीएसएमटीसाठी स. ९.५३ ते दु. ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर सेवा
- गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटीसाठी सुटणारी स. १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर सेवा बंद राहणार आहेत.