Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाकरेंसाठी फडणवीस…यूपीत योगींसाठी मोदी सरकारमधील मंत्रीच विरोधात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
yogi adityanth

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील कोरोना लढ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आरोप केलेत. त्यामुळे वाद उसळलेला असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही असंच पत्र आलं आहे. मात्र, तिथं विरोधातील फडणवीसांची भूमिका भाजपाच्याच केंद्रीय मंत्र्यांनी बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू केंद्रीय कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी योगी आदित्यनाथांना एक पत्र लिहिले आहे. त्यांना लिहिलेल्या या पत्रात गंगवारांनी उत्तरप्रदेशामधील कोरोना हाताळणीतील अनागोंदीस लक्ष्य केले आहे.

गंगवार यांनी कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. उत्तरप्रदेशातील सरकारी अधिकारी फोन उचलत नाहीत. व्यापारी वैद्यकीय उपकरणे दीड पट दराने विकत आहेत. रुग्णालयांमधील रुग्णांना रेफरलच्या नावाखाली फिरवले जातं. त्यांना भरती केले जात नाही आहे. त्यात काहींचा मृत्यूही ओढवत आहे, असे अनेक आरोप त्यांनी पत्रात केले आहेत.

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी योगी आदित्यनाथांना लिहिलेल्या पत्रातील मुद्दे-

  • केंद्रीय मंत्री असूनही बरेलीचे शहर आरोग्य अधिकारी माझा फोन उचलत नाहीत.
  • उपचाराअभावी कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. बरेलीतील सर्व खासगी रुग्णालयात कोरोना रूग्णांना भरती करण्याची सुविधा दिली पाहिजे.
  • कोरोना बाधित रूग्णाला शक्य तितक्या कमी वेळात रेफरल रुग्णालयात दाखल करणे फार महत्वाचे आहे. रेफरल असूनही, पीडित रुग्णाला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत असून, त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले जाते. रुग्ण इकडे तिकडे फिरत राहतो. त्याची ऑक्सिजन पातळी सतत घसरली जाते. हा चिंतेचा विषय आहे. बर्‍याच घटनांमध्ये, रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.
  • बरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य सुविधा आणि कोरोना व्यवस्थापन सुधारण्यासाठी ७ मुद्दे सुचवले होते. पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
  • कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरली जाणारी महत्त्वाची उपकरणे व्यापारी संस्था जास्त किंमतीवर विकत आहेत. त्यामुळे या सर्व महत्त्वपूर्ण उपकरणांचा दर राज्य सरकारने ठरवावा.
  • बरेलीमध्ये रिक्त ऑक्सिजन सिलिंडर्सची मोठी कमतरता आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे शहरातील बरेच लोक सावधगिरी म्हणून घरात ऑक्सिजन सिलिंडर ठेवतात. अशी घरे चिन्हांकित करून, सिलिंडर ठेवणाऱ्यांवर कारवाई करुन गरजूंना ही सुविधा पुरविली पाहिजे. साठा असलेले सिलिंडर्स मनमानी दराने विकला जात आहे.
  • आयुष्मान इंडियाशी जोडलेली सर्व रुग्णालयांमध्ये लस नोंदणीसह लस उपलब्ध करुन द्याव्यात. जेणेकरुन लस घेणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल आणि कोरोनापासून आपला बचाव करू शकेल.
  • एमएसएमई अंतर्गत ऑक्सिजन प्लांट्स स्थापन करू इच्छिणाऱ्या सर्व उद्योगांना सरकारने ५०% सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर, मी सुचवितो की बरेलीतील काही खासगी सरकारी रुग्णालयांनाही लवकरात लवकर ५०% सवलत द्यावी जेणेकरुन ऑक्सिजनची समस्या दूर होऊ शकेल.

Tags: cm uddhav thackeraydevendra fadanvisoxygen cylindersantosh gangavarvaccineyogi adityanathआयुष्मान इंडियाऑक्सिजन प्लांट्सऑक्सिजन सिलिंडरकोरोनादेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री उद्धव ठाकरेयोगी आदित्यनाथलससंतोष गंगवार
Previous Post

व्हॉट्सअॅप कोणाचेही अकाऊंट डिलीट करणार नाही

Next Post

रविवारी दिलासा! ४८ हजार नवे रुग्ण, ६० हजार बरे झाले! प. महाराष्ट्र, विदर्भ सर्वात जास्त!

Next Post
mcr 23-4-21

रविवारी दिलासा! ४८ हजार नवे रुग्ण, ६० हजार बरे झाले! प. महाराष्ट्र, विदर्भ सर्वात जास्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!