Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी ऐकावा असा केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवालांचा संदेश

September 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
lav agarwal

मुक्तपीठ टीम

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने युनिसेफशी भागीदारी करत, आकाशवाणी आणि देशातील इतर सर्व खाजगी एफएम आणि कम्युनिटी रेडीओ वाहिन्यांच्या प्रतिनिधींसोबत एक संवादात्मक चर्चासत्र आयोजित केले होते. आगामी सणासुदीच्या काळात, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याच महत्त्व सांगणारे संदेश व्यापक स्तरावर जनतेपर्यंत पोचवण्याचे नियोजन करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सणावाराला कोरोना नियमांच्या सक्तीविरोधातील आंदोलनांना तसेच राजकीय कार्यक्रमांसाठी गर्दी जमवणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी लक्षपूर्वक ऐकावा असा लव अग्रवालांचा संदेश आहे. ते म्हणालेत, “दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणूनच आपण उत्सव साजरे करतो. हे लक्षात ठेवत कोरोना महामारीचा अंत करण्यासाठी आपण प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे!”

 

विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांचे सुमारे १५० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. या सर्व वाहिन्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या असून त्यांचा श्रोतृवर्गही मोठा आहे. अगदी शहरी भागांपासून, ग्रामीण आणि दुर्गम भागातही रेडीओचे अस्तित्व आणि लोकप्रियता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, यांनी या चर्चासत्रात, सर्वांशी संवाद साधला. जनहिताचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात माध्यमांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. भारताने, अत्यंत विक्रमी वेळात कोरोना रुग्णसंख्याआटोक्यात आणली आहे. टेस्ट-ट्रॅक-ट्रीट ही त्रिसूत्री आणि लसीकरण धोरणातून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता आले आहे, असे सांगत, लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी नागरिकांचेही कौतुक केले.

 

कोरोना रुग्णांची संख्या कमी पण विषाणूचे अस्तित्व कायम!

  • मात्र, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कामी होत असली तरीही या विषाणूचे अस्तित्व कायम आहे.
  • या घडीला कोणत्याही चुकीच्या किंवा बेसावध वर्तनाने रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
  • “लवकरच देश १०० कोटी मात्रांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे.
  • या विषाणूविरुद्धच्या लढ्यात विजय दृष्टीपथात असला, तरी गाफील राहून किंवा निष्काळजीपणा मुळे किंवा थकव्यामुळे आपण मोठ्या कष्टाने कोरोनाविरोधात आपल्या हातातोंडाशी आलेला विजय, हातातून निसटू देता कामा नये.
  • येत्या सणासुदीच्या काळातही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात आळस करू नये.” असे आवाहन अग्रवाल यांनी केले.

 

दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणूनच आपण उत्सव साजरे करतो. हे लक्षात ठेवत कोरोना महामारीचा अंत करण्यासाठी आपण प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.

 

या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींनी हा संदेश व्यापक प्रमाणात घराघरात पोचवावा. लसींच्या दोन्ही मात्रा घेण्याचे महत्त्व, आणि कोरोना नियमांचे पालन याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. या संदेश अधिकाधिक प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी, काही अभिनव पद्धती वापराव्या, तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

आरोग्य मंत्रालयासह, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि युनिसेफचे प्रतिनिधीही या चर्चासत्रात सहभागी झाले होते.


Tags: BJPcoronalav agarwalआरोग्य मंत्रालयकेंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवालकोरोना
Previous Post

“सरकार चालवणं जमत नसेल तर खुर्च्या खाली करा!” ऐनवेळी परीक्षा रद्द करणाऱ्या सरकारवर भाजपाचा हल्लाबोल

Next Post

आयोगानं सरकारला बजावलं, “आता निवडणुका पुढे ढकलणं शक्य नाही”!

Next Post
EC

आयोगानं सरकारला बजावलं, "आता निवडणुका पुढे ढकलणं शक्य नाही"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!