Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयोगानं सरकारला बजावलं, “आता निवडणुका पुढे ढकलणं शक्य नाही”!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
EC

मुक्तपीठ टीम

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्देशानुसारच या निवडणुका होत आहेत असे निवडणूक आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने जर आदेश दिले तर निवडणूक कार्यक्रमात बदल होऊ शकतो, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. आता सरकारची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

राज्य सरकारने केली होती विनंती

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाच जिल्हा परिषदेत आणि पंचायत समिती मधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.
  • रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
  • या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं.
  • भाजप नेते आणि ओबीसी संघटनेच्या दबावानंतर राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.
  • ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती.
  • मात्र या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच घेण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळवले आहे.

 

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाशिवाय या निवडणुका थांबवणे शक्य नाही
ही निवडणूक अंतिम टप्प्यात असून ठरल्याप्रमाणे ५ ऑक्टोबर या दिवशी मतदान होणार असून दिनांक ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
अशी परिस्थिती असताना आयोगाला या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाशिवाय या निवडणुका थांबवणे शक्य होणार नाही, असे आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात काही आदेश मिळाले, तर आयोगाला त्यानुसार पढील कारवाई करणे शक्य होईल.

 

निवडणूक कार्यक्रम

  • या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या एकूण ८५ जागांसाठी मतदान होणार असून पंचायत समितीच्या १४४ जागांवर लढत होणार आहे.
  • १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार
  • सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
  • २९ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
  • ५ ऑक्टोबर रोजी होणार मतदान
  • ६ ऑक्टोबर रोजी निकाल

Tags: bhagat singh koshariBJPelection commissionOBC reservationओबीसी आरक्षणनिवडणूक आयोगभगतसिंह कोश्यारीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी ऐकावा असा केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवालांचा संदेश

Next Post

“चंद्रपूर येथील वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
CM

"चंद्रपूर येथील वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!