Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांगजनांना सहाय्यकारी साहित्य

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
vayoshree

मुक्तपीठ टीम

ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत हिंगोलीत आयोजित “सामाजिक सक्षमीकरण शिबिराचे” केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आज उदघाटन करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले मुंबईतून व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून या शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी हिंगोलीतील तीन हजारांपेक्षा जास्त दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे आणि साधनं वितरीत करण्यात आली.

 

सध्या लागू असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन, दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यक साधनांचे मोफत वाटप करणारे आभासी ADIP शिबीर हिंगोली जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीतील वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सुमारे २.७५ कोटींहून अधिक रुपयांच्या सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे वितरण करण्यात आले. ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत हिंगोलीतील एकूण ३२६० वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सुमारे ६५२७ सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांना मदत म्हणून देण्यात आलेल्या या एकवीस प्रकारच्या साहित्यांमध्ये ट्रायसिकल फोल्डिंग व्हीलचेअर, स्मार्ट कॅन, चष्मा, कृत्रिम दात आदींचा समावेश आहे.

 

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपले मंत्रालय दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या काळातही सरकारच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने आणि उपकरणे यांचे वितरण करण्यासाठी अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांना मदत करण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याची सरकारची योजना असून त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले.

 

दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून आत्तापर्यंत २० ते २५ लाखांहून अधिक दिव्यांगांना मदत करण्यात आली आहे असे त्यांनी नमूद केले. दिव्यांगांचे भविष्य उज्वल करण्याची सरकारची जबाबदारी असून त्यासाठी समाजानेही साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. सरकारच्या विविध योजना तसेच कौशल्य प्रशिक्षण या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर मुंबईतही अशा प्रकारचे शिबिर भरवण्याचा विचार असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.


Tags: central govtRashtriya Vayoshri Yojanaदिव्यांगपंतप्रधान नरेंद्र मोदीरामदास आठवलेराष्ट्रीय वयोश्री योजनाहिंगोली
Previous Post

ईपीएफओच्या आकडेवारीनुसार भारतात रोजगाराच्या स्थितीत सुधारणा

Next Post

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १०० जागांसाठी भरती

Next Post
akola

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १०० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!