Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेच्या १५ बंडखोर आमदारांना केंद्राची ‘Y+’ सुरक्षा का मिळाली?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Security Outside Sada sarvankar House

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या १५ बंडखोर आमदारांसह त्यांच्या कुटुबीयांना केंद्रातील मोदी सरकारकडून ‘Y+’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्या पोलीस असतानाही त्यांना केंद्राकडून ही सुरक्षा का मिळाली, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. पण ही सुरक्षा मिळण्यात शिवसेना नेत्यांच्या डरकाळ्यांचा आणि शिवसैनिकांच्या रस्तोरस्ती उसळलेल्या संतापाचा मोठा वाटा आहे.

शिवसेना नेते संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांना मुंबईत येण्याचा इशारा देत असतात तर, दुसरीकडे शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांचा निषेध करत आहेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंनीही महाराष्ट्र पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे निर्देशही दिले होते. पण केंद्रीय गृहमंत्रालयाला असलेल्या विशेषाधिकारांचा वापर करुन ही सुरक्षा देण्यात आल्याचे कळते.

काय होता संजय राऊतांचा ईशारा?

  • गुवाहाटी गाठलेल्या शिवसेनेच्या आमदारांना संजय राऊत वारंवार मुंबईत या मग कळेल, असा इशारा देत आहेत.
  • आजही लाखो शिवसैनिक आमच्या एका इशाऱ्याची वाट पाहत आहेत, त्यांना मुंबईत यावे लागेल, असे ते म्हणाले.
  • शनिवारी शिवसैनिकांनी काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोडही केली.

एकनाथ शिंदेंनीही लिहिले होते पत्र

  • शनिवारी शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे डीजीपी यांना पत्र लिहिले.
  • गुवाहाटीला पोहोचलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी या पत्रात करण्यात आली होती.
  • याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले होते की, फक्त आमदारांनाच सुरक्षा देण्यात आली आहे, त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा दिली जाऊ शकत नाही.
  • राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते.

उपसभापतींविरोधात शिंदे गट न्यायालयात जाणार…

  • महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींविरोधात शिंदे गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याविरोधात कायदेशीर मत मागवल्यानंतर शिंदे गट कोर्टात जाऊ शकतो.
  • उपसभापतींनी नोटिसा बजावल्यानंतर उत्तर देण्यासाठी आमदारांना किमान आठवडाभराचा अवधी द्यायला हवा होता, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

शिवसेनेच्या या आमदारांना मिळाली केंद्राची सुरक्षा!

१. सदा सरवणकर
२. रमेश बोरनारे
३. मंगेश कुडाळकर
४. संजय शिरसाट
५. लताबाई सोनवणे
६. प्रकाश सुर्वे
७. योगेश कदम
८. प्रताप सरनाईक
९. यामिनी जाधव
१०. प्रदीप जैस्वाल
११. संजय राठोड
१२. दादाजी भुसे
१३. दिलीप लांडे
१४. बालाजी किणीकर
१५. संदीपान भुमरे


Tags: central GovernmentCRPFEknath ShindeMaharashtra Political CrisisY+ Securityउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्रशिवसेना
Previous Post

शिवसेना बंडखोरांचे १२ वाजवणारे कायदेतज्ज्ञांचे ६ मुद्दे!

Next Post

#मुक्तपीठ #Live आदित्य ठाकरे : “काश्मिरी पंडितांना नाही, बंडखोरांना CISF सुरक्षा का?”

Next Post
#मुक्तपीठ #Live   आदित्य ठाकरे : “काश्मिरी पंडितांना नाही, बंडखोरांना CISF सुरक्षा का?”

#मुक्तपीठ #Live आदित्य ठाकरे : "काश्मिरी पंडितांना नाही, बंडखोरांना CISF सुरक्षा का?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!