Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारची ‘स्माइल’ योजना

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
beggars

मुक्तपीठ टीम

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने उपजीविका आणि रोजगारासाठी उपेक्षित व्यक्तींना साहाय्य म्हणजेच स्माइल ही योजना तयार केली आहे. या योजनेत भिक्षेकरी व्यक्तींसाठी कल्याणकारी उपाययोजनांसह अनेक सर्वंकष उपाय आहेत.

 

पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, समुपदेशन, मूलभूत दस्तऐवजीकरण, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक संलग्नता आणि अशा अनेक बाबी या योजनेच्या केंद्रस्थानी आहेत. ही योजनेनुसार राज्य सरकारच्या मदतीने मुंबई, नागपूर, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंदूर, लखनऊ, पटना आणि अहमदाबाद अशा दहा शहरांमध्ये भिक्षेकरी व्यक्तींच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरु केले गेले आहेत. ही नवी योजना केंद्रशासित प्रदेश सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, समुदाय आधारित संस्था संस्था आणि इतरांच्या पाठिंब्याने राबविली जाईल.

 

‘स्माइल’ योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

• “एसएमआयएलई (SMILE)- उपजीविका आणि रोजगारासाठी उपेक्षित व्यक्तींना साहाय्य ” ही योजना तयार करण्यात आली आहे.
• या योजनेत ‘भिक्षेकरी व्यक्तींच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी केंद्र पुरस्कृत योजना’ ही उप योजना समाविष्ट आहे.
• पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, समुपदेशन, मूलभूत दस्तऐवजीकरण, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक संलग्नता इ.या योजनेच्या केंद्रस्थानी आहे.
• भिक्षेकरी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार आणि शहरी स्थानिक संस्था यांच्याकडे उपलब्ध असलेली निवारा घरे वापरण्याची तरतूद या योजनेत आहे.
• विद्यमान निवारा घरे उपलब्ध नसल्यास, अंमलबजावणी करणार्‍या संस्थेद्वारे नवीन समर्पित निवारा घरे उभारली पाहिजेत. या योजनेंतर्गत आगामी पाच वर्षांसाठी देण्यात आलेला निधी खाली दिला आहे:

 

दहा महानगरांमध्ये काम सुरु

• सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मुंबई, नागपूर, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंदौर , लखनौ , पटना आणि अहमदाबाद अशा दहा शहरांमध्ये भिक्षेकरी व्यक्तींच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू केले आहेत.
• हे प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश / स्थानिक शहरी संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत या शहरांमध्ये राबविण्यात येत आहेत.
• सर्वेक्षण आणि ओळख, एकत्रीकरण, मूलभूत स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा, मूलभूत कागदपत्रे प्रदान करणे, समुपदेशन, पुनर्वसन, शिक्षण, कौशल्य विकास आणि भिक्षेकरी व्यक्तींच्या कल्याणासाठी शाश्वत तोडगा यासह अनेक व्यापक उपाययोजना या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाअंतर्गत राबवल्या जात आहेत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री ए. नारायणस्वामी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

(या बातमीच्या व्हिडीओत तसेच बातमीसोबत वापरलेली छायाचित्र ही ट्विटरवरून घेण्यात आली आहेत)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: SMILEएसएमआयएलईराज्यमंत्री श्री ए. नारायणस्वामीस्माइल योजना
Previous Post

आर्थिक संकटातील ज्येष्ठ अभिनेत्रींना सुप्रिया पिळगावकरांची साथ!

Next Post

अॅग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्डामार्फत ६५ जागांवर संधी

Next Post
ASRB

अॅग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्डामार्फत ६५ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!