मुक्तपीठ टीम
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. सुशांत त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. याआधी मुंबई पोलिसांकडून त्यांच्या मृत्यूचा तपास सुरू होता. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. दोन वर्ष उलटली तरीही अद्याप तपास यंत्रणेकडून तपासात विशेष प्रगती झाल्याचं समोर आलेलं नाही. उलट या प्रकरणी सीबीआयकडून माहितीच्या अधिकाराखाली म्हणजेच आरटीआयखाली माहिती मागवण्यात आली असता नकार मिळाला आहे. पुण्यातील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागितली होती.
दोन वर्ष होत आली असतानाही सीबीआयचा तपास सुरुच!
- १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले.
- बॉलिवूड स्टार्सपासून चाहत्यांना धक्का बसला होता.
- मुंबई पोलिसांनी आकस्मित मृत्येचे प्रकरण नोंदवले होते.
- सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप करून तपासाची मागणी केली.
- सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणाला जूनमध्ये २ वर्षे होतील.
- या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सीबीआयला देण्यात आला.
- मधल्या काळात रिया चक्रवर्तीला एनसीबीने सुशांतला ड्रग पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली.
- पण पुढे काही महिन्यांच्या कोठडीनंतरही समोर काही आले नाही.
- उच्च न्यायालयाने तिला जामीन दिला.
- आता पावणेदोन वर्षांनंतरही सीबीआय या प्रकरणात अधिकृत काहीच उघड करत नाही.
- त्यामुळे तपासाची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकाराखाली अर्ज करण्यात आला.
- मात्र, माहिती दिल्यास तपासावर परिणाम होण्याचे कारण देत सीबीआयकडून नकार देण्यात आला.
प्रफुल्ल सारडा यांची प्रतिक्रिया
- “न्याय विलंब म्हणजे न्याय नाकारला” असे म्हणता येईल.
- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळपास २ वर्षे (२१ महिने) एवढा कालावधी झाला आहे.
- सीबीआयकडे तपास सुरू आहे.
- खूप वेळ का लागतोय?
- जर ही आत्महत्या असेल तर सीबीआयने हे सार्वजनिक केले पाहिजे की सुशांत सिंग राजपूत प्रकरण आत्महत्या होती आणि हत्या नव्हती.
- कारण त्याच्या अनेक चाहत्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे.
- जर सीबीआयला सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू खुनाचा होता हे समजले तर कोणीही सोडले जाऊ नये.
- परंतु सत्य सर्वांसमोर येण्याची वेळ आली आहे, असे पुण्यातील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा म्हणाले.