मुक्तपीठ टीम
चाईल्ड पोनोग्राफी प्रकरणी सीबीआयने देशभरात धडक कारवाई सुरु केली आहे. देशातील २० राज्यांमध्ये सुमारे ५६ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. ‘ऑपरेशन मेघदूत ‘ अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोल युनिटने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयकडून ही छापेमारी केली जात आहे. निरागसांचं जीवन उध्वस्त करणाऱ्या या विकृतांना मुसक्या आवळून त्यांच्या कारवाया थांबवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जात आहे. गेल्यावर्षीही यासाठीच ‘ऑपरेशन कार्बन’ राबवण्यात आले होते.
सीबीआयचे २० राज्यात छापे
- सीबीआयचे हे छापे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पाटणासह २० राज्यांमध्ये सुरू आहेत.
- या संपूर्ण प्रकरणात अशा अनेक टोळ्या सक्रीय असून, ज्या केवळ चाइल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्रीचा वापर करण्याबरोबरच मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल करून त्यांचा वापर करत आहेत.
- या टोळ्या गट तयार करून वैयक्तिकरित्या काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षीही राबवले ‘ऑपरेशन कार्बन’!!
- इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयला सिंगापूरमधून या प्रकरणी माहिती मिळाली. त्यानंतर सीबीआयकडून देशभरात छापेमारी करत कारवाई करण्यात आली आहे.
- मिळालेल्या माहितीनूसार, गेल्या वर्षी देखील ऑपरेशन केले गेले होते ज्याचे नाव ‘ऑपरेशन कार्बन’ होते.