मुक्तपीठ टीम
केंद्रीय अन्वेषण विभागाने डीएचएफएल कर्ज फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आरोपपत्रात स्पष्ट केले आहे की, आरोपींनी मनी लाँड्रिंगसाठी ८७ बनावट कंपन्या आणि सुमारे २ लाख ६० हजार बनावट कर्जदार तयार केले होते. आरोपींनी मनी लॉन्ड्रिंगसाठी एक आभासी शाखा देखील तयार केली होती. सीबीआय ३४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त डीएचएफएल फसवणूक प्रकरणाची चौकशी करत आहे. सीबीआयच्या चार्जशीटमध्ये नेमकं काय नमुद केले आहे ते जाणून घेवूया…
सीबीआय चार्जशीट
- फसवणूक प्रकरणातील आरोपपत्रात, सीबीआयने म्हटले आहे की २००७ ते २०१७ दरम्यान, डीएचएफएलने ८७ शेल कंपन्या स्थापन करून ११,७६५ कोटी रुपयांहून अधिक पैसे दिले.
- पैसे वळवण्यासाठी व्हर्च्युअल शाखाही तयार करण्यात आली.
- कपिल आणि धीरज वाधवन यांनी वळवलेल्या निधीतून ६३ कोटी रुपयांची २४ पेंटिंग्ज खरेदी केली होती.
- सीबीआयने दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात कंपन्यांसह एकूण ७५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
वांद्रे शाखेच्या नावाखाली फसवणूक!
- ही फसवणूक करण्यासाठी, बनावट कंपन्यांचा वापर करून बँकांकडून पैसे घेतले जात होते.
- पैसे स्वतःच्या कंपनींमध्ये वळवण्यात आले होते.
- कर्ज वितरणासाठी डीएचएफएलच्या अनेक शाखा होत्या.
- या बनावट कंपन्यांना वितरणासाठी कंपनीने वांद्रे शाखा नावाचा विशेष कोड तयार केला होता.