Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मविआवर घोंघावतंय एक वेगळं ‘सीबीआय’ संकट?

२१ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यांमधील १०१ घोटाळ्यांचा तपास थांबण्यासाठी केंद्राचं महाराष्ट्राकडे बोट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
CBI And MANTRALAY

मुक्तपीठ टीम

सीबीआयकडे नऊ राज्यांमधील किमान १७३ प्रकरणांचा तपास प्रलंबित असल्याची धक्कादायक आकडेवारी लोकसभेत उघड झाली आहे. सीबीआय राज्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही नवीन प्रकरणाचा तपास सुरू करू शकत नाही. त्यामुळे १७३ प्रकरणांचा तपास राज्यांच्या परवानगीअभावी रखडल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच यातील १२८ प्रकरणे ही बँक घोटाळ्यांची असून त्यात २१ हजार कोटींची रक्कम गुंतली असल्याचेही ते म्हणाले. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक १०१ बँक घोटाळ्याची प्रकरणे प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. जाणकारांच्या मते भाजपा खासदार सुशिल मोदींनी खास विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारने उघड केलेली ही माहिती भविष्यात या १०१ बँक घोटाळ्यांचा तपास राज्य सरकारची मंजुरी नसली तरीही न्यायालयीन मार्गाने सीबीआयकडे देण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे मविआ सरकारवर नवं सीबीआय संकटांचं वादळ घोंघावू लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी काढून घेतली तपासाची परवानगी!

  • सीबीआय एकट्या महाराष्ट्रात १३२ प्रकरणांचा तपास करू शकत नाही.
  • येथे महाविकास आघाडी सरकारने दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट अॅक्टच्या कलम ६ नुसार सीबीआय तपासासाठी दिलेली सहमती मागे घेतली आहे.
  • त्याचप्रमाणे इतर अनेक बिगर भाजपशासित राज्यांनीही सीबीआयला तपास करण्यासाठी मंजुरी दिलेली नाही.
  • भाजपा खासदार सुशील मोदी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, पंजाबमध्ये १६, छत्तीसगडमध्ये ८, झारखंडमध्ये ७, पश्चिम बंगालमध्ये ६ आणि राजस्थान आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन प्रकरणे प्रलंबित आहेत.
  • या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
  • या सर्व राज्यांसह मेघालय आणि मिझोराम यांनी २०१५ मध्येच सीबीआय चौकशीसाठी सहमती मागे घेतली.
  • यानंतर सीबीआयला कोणतेही नवीन प्रकरण हाती घेण्यापूर्वी राज्यांची परवानगी घ्यावी लागते.
  • केंद्र सरकार त्यांच्या विरोधात केंद्रीय एजन्सीचा वापर करत असल्याचा या राज्यांचाही आरोप आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक १०१ बँक घोटाळ्यांची प्रकरणे तपासाविना प्रलंबित!

  • जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितले की, १७३ प्रलंबित प्रकरणांपैकी १२८ प्रकरणे बँक घोटाळ्यांची आहेत.
  • २१ हजार कोटी रुपयांचे बँक घोटाळे राज्याच्या मंजुरी अभावी सीबीआय तपासाच्या कक्षेत येत नाहीत.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक १०१ बँक फसवणुकीची प्रकरणे प्रलंबित आहेत.
  • गेल्या महिन्यात, सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी यांनी असेही म्हटले होते की राज्यांनी सहमती मागे घेतल्याने किमान १०० खूप मोठ्या रकमांची बँक फसवणूक प्रकरणे नोंदविली जाऊ शकली नाहीत.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणावर चिंता व्यक्त केली होती.

Tags: Jitendra singhMaharashtraMVAजितेंद्र सिंहबँक घोटाळेभाजपामविआमहाराष्ट्रसीबीआय
Previous Post

ईडीच्या कारवाईनंतर आता प्रताप सरनाईक काय करणार?

Next Post

ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तनात सहकार विभागाची महत्त्वाची भूमिका – बाळासाहेब पाटील

Next Post
balasahebh patil

ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तनात सहकार विभागाची महत्त्वाची भूमिका - बाळासाहेब पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!