Uncategorized

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) तरूण वर्गाचा चाहता अभिनेता वरुण धवन सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये त्याचा नवा चित्रपट ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी सिनेमाचे शूटींग करत आहे. वरुणने एका चिमुकल्या सोबतचा व्हिडीओ आणि फोटो नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वरूण या चिमुकल्याच्या प्रेमात पडला आहे. २) सोशल मीडियावर व्हायरल झालेला अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये जान्हवी मुंबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी एक चाहता जान्हवीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या कर्मचाऱ्याने या चाहत्याच्या हातावर फटका मारत दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट जान्हवीच्या लक्षात आली तेव्हा तिने त्या चाहत्याला नाराज न करता, स्वत: चाहत्या जवळ जाऊन आणि सेल्फी काढला. ३) कोरोनाचे लसीकरण सुरू असताना अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी कोरोनाची लस घेतल्याची चर्चा आहे. तेव्हाच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक अशी ओळख असणारे सचिन पिळगावकरा यांनी नुकतेच कोरोनाची लस घेतली आहे. बीकेसी येथील जम्बो कोरोना सेंटरमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. ४) साऊथ अभिनेत्री समंथा अक्किनेनी आपल्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांचे मन घायाळ करत असते. हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेतच आणि ती त्यावर नेहमी सक्रिय असते. समंथाने सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘डोन्ट रश’ चॅलेंजमध्ये भाग घेत हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे ती चर्चेत आहे. ५) मराठीसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे ही नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत लोकांना पाहण्यास मोह पाडते. सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू असल्याचे कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. यामुळे ती चर्चेत आहे.

Read more

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, ९ मार्च २०२१ – आज राज्यात ९,९२७ नवीन रुग्णांचे निदान. आज १२,१८२ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण २०,८९,२९४करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आज रोजी एकूण ९५,३२२ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.३४% एवढे झाले आहे. राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद सध्या राज्यातील मृत्यूदर २.३५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७०,२२,३१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,३८,३९८ (१३.१५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५७,९६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत ३,८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. महारा

Read more

गुन्हे महत्त्वाचे: 1)विरारमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 3)ई चलान प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आणणे शक्य होत आहे. या प्रणालीत अलीकडेच केलेल्या तांत्रिक बदलांमुळे गेल्या दोन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी २४ चोरीची वाहने जप्त केली असून ती चोरणाऱ्या किंवा वापरणाऱ्यांची ओळखही पटवली आहे. 4)जावळी तालुक्यातील हुमगाव येथे पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबल पद्मसेन संभाजीराव घोरपडे यांनाच महिलेच्या पतीने मारहाण केली. यात ते जखमी झाले. या प्रकरणी संतोष व्यंकट पवार याच्याविरोधात कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे* : १) “लव सुलभ” या चित्रपटाचे चित्रीकरण ठाणे येथे सुरू झाले आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे. २) अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या हॉट लूकने प्रेक्षकांचे मन घायाळ करत असते. काही दिवसांपूर्वीच उर्वशीचा ‘एक लडकी भीगी भागी सी’ अल्बम रिलीज झाला आहे. यात तिचा पावसात लाल साडीवर ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. या अल्बमला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. ३) भाजपा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीस आपले नवीन गाणे घेऊन आल्या आहेत. त्यांचे हे गाणे नाट्य संगीतावर आधारित आहे. ४) हेमंत ढोमे यांनी काही दिवसांपूर्वी‘झिम्मा’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. या सिनेमात अनेक लोकप्रिय चेहरे पाहण्यास मिळणार आहेत. एकाच सिनेमात एवढी मोठी स्टार कास्ट असल्याने सिनेमा विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच हा सिनेमा जबरदस्त असेल हे लक्षात येत आहे. ५) ‘हरफनमौला’ या गाण्यात आमिरचा रोमॅण्टिक अंदाज पाहण्यास मिळतोय. एलीसोबत आमिर या गाण्यात जबरदस्त डान्स करत आहे. आमिर खानचा ‘कोई जाने ना’ सिनेमा २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच निरोप घेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. या मालिकेने शेवटी काल म्हणजेच ७ मार्चला सगळ्यांचा निरोप घेतला आहे. काल या मालिकेचा शेवटचा भाग पाहण्यास मिळाला. २) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक खाकी वर्दीतील फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. ती डिजिटल पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे. सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारत आहे. ३) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारा नवा चित्रपट ‘राम सेतू’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसणार आहेत. ४) ‘जॉबलेस’ या नावाची वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजच्या पटकथेत सस्पेंस क्राईम थ्रिलर पाहण्यास मिळणार आहे. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे. सध्या या सीरिजच्या शुटींगची सुरूवात झाली आहे. ५) गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता हीचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी झाले आहे. लॉकडाउनच्या कळात त्यांनी लग्न केले होते. त्यांच्याकडे लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अरुण गवळी आजोबा होणार आहेत. अभिनेता अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगिताच्या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Read more

क्रीडा थोडक्यात: १) स्विस खुल्या सुपर ३०० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा स्वित्झर्लंडच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरिनपुढे निभाव लागला नाही. मरिनने केवळ ३५ मिनिटांत सिंधूला पराभवाची धूळ चाखली. मरिनने अंतिम सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत २१-१२, २१-५ अशा फरकाने सिंधूला नमवले. त्यामुळे सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. २) भारतीय महिला क्रिकेट संघाने जवळपास वर्षभरानंतर पहिला आंतरराष्ट्रीय समाना खेळला. मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. भारताने ५० षटकांत ९ बाद आणि १७७ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाने उभी केलेली धावसंख्या ४०.१ षटकांत २ बाद १७८ धावा करत पार केली आणि पहिल्या एकदिवसीय सामना आपल्या नावे केले. ३) आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकवणारा मुंबई इंडियन्स संघ यावर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. तसेच या हंगामात मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या घरच्या मैदान असलेल्या चेपॉत मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्ली ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकत्तामध्ये २ समाने खेळले जाणार आहेत. ४) मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच सुवर्णपदकाची कमाई करत ती या वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी झेप घेतली आहे. अंतिम फेरीत विनेशने कॅनडाच्या डायना मेरीचा ४-० असा पराभव केला.

Read more

गुन्हे महत्त्वाचे: 1)कल्याण स्टेशन परिसरात चप्पलच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागली असून ते जळून खाक झालं. मात्र, ६ दिवसानी दुकानाची साफसफाई करताना दुकानात एका ११ ते १२ वर्षीय मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहे 2)हडपसर पांढरे मळा येथे राहणारी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला, ही घटना हडपसर येथील अग्रवाल गंगा रेसीडेन्सी या इमारतीच्या ठिकाणी घडली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. 3)शहरातील द्याने परिसरातील एका हिंदू मुलीचे बळजबरीने व बेकायदेशीरपणे धर्मांतर करून मुस्लिम युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे. मुलीच्या आईने याबाबत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. 4)महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सांगलीत बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी एका गाडीवर कारवाई केली आहे. 5)मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीतील मुलीच्या वडिलांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. चाकू, एअरगन, चॉपर यासह हत्यारे घेऊन आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुदैवानं या हल्ल्यात मुलगा बचावला आहे.

Read more

गुन्हे महत्त्वाचे- 1) मुंबईत एका अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.टीव्ही अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी फआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 2) रचिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या नवजात एक महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे. दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली या रागातून एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून या निर्दयी आईने तिची हत्या केली. 3)कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्या मुलीचे वडील व मामा धावून आले. त्यावेळी पालोदकरने चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खुलताबाद येथून तिघांना अटक केली. 4)सेल्फी फोटो व्हायरल करण्याची आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. जुने नाशिक परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. संशयित १७ वर्षीय मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5)मुंबईतून गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच हजार वाहने बेपत्ता झाली असून त्यातील तीन हजार वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला आहे.

Read more

गुन्हे महत्त्वाचे : 1) मुंबईच्या किनारपट्ट्यांवरील तस्करीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. मुंबईत छुप्या मार्गाने येणारे अमली पदार्थ असोत वा करचोरी करुन येणाऱ्या वस्तू, त्या प्रामुख्याने न्हावा-शेवा किंवा अन्य बंदरातून आणल्या जात आहेत. यामुळे महसुल गुप्तचर संचालनालयाने किनारपट्ट्यांवर मोठी मोर्चेबांधणी केली आहे. 2) मुंबईमध्ये दोन दिवसांत तब्बल ८३ कोटी रुपयांची जीएसटी करचोरी उघड झाली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळांच्या टीमनेकेंद्रीय जीएसटीअंतर्गत टाकलेल्या छाप्यात ही करचोरी समोर आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने मुकेश अहुजा नावाच्या व्यापाऱ्याला या प्रकरणात अटक केली. 3) ३ लाखांमध्ये १ हजार ४४० अमेरिकन डॉलर देतो असे सांगून भामट्यांने डॉलरऐवजी वृत्तपत्राचे कागद देऊन भाईंदरमधील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून भामट्यांचा शोध सुरू आहे. 4)भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने कोपरी गावातील एका वृद्धेच्या हाताला व नाकातोंडाला चाकूच्या धाक दाखवून चिकटपट्टी लावून तिच्या अंगावरील सुमारे ४ लाखांचे दागिने लुटून फरार झालेल्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पकडण्यात यश मिळाले आहे.

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू होती. ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लाळ देवा म्हणजेच राणा दग्गुबत्ती याच्या ‘हाथी मेरे साथी’ सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला आहे. यावर त्यांने भरपूर मेहनत केली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. सध्या हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. २) लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार असल्याची माहिती महाभारतात युधिष्ठिर ही भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी नरेंद्र मोदी यांच्या लूकमधील फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. ३) प्रसिद्ध कॉमेडीयन स्टार कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. सध्या तो त्याच्या मुलीमुळे चर्चेत आहे. कपिलच्या गोड मुलीने सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनायराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावर कपिलने ‘माय लिटील रॉकस्टार’ असं कॅप्शन लिहलं आहे. ४) अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगला सध्या सुरुवात झालीय. याचे नाव ‘दसवी’ असे आहे. या सिनेमाच्या सेटवरील अभिषेकचा एक फोटो समोर आला आहे. अभिषेकने स्वत: इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघेही निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या नव्या पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती हे दोघे करत आहेत. अशी माहिती मिळाली आहे.

Read more
Page 18 of 23 1 17 18 19 23

ताज्या बातम्या

error: Content is protected !!