Uncategorized

क्रीडा थोडक्यात: १) स्विस खुल्या सुपर ३०० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा स्वित्झर्लंडच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरिनपुढे निभाव लागला नाही. मरिनने केवळ ३५ मिनिटांत सिंधूला पराभवाची धूळ चाखली. मरिनने अंतिम सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत २१-१२, २१-५ अशा फरकाने सिंधूला नमवले. त्यामुळे सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. २) भारतीय महिला क्रिकेट संघाने जवळपास वर्षभरानंतर पहिला आंतरराष्ट्रीय समाना खेळला. मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. भारताने ५० षटकांत ९ बाद आणि १७७ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाने उभी केलेली धावसंख्या ४०.१ षटकांत २ बाद १७८ धावा करत पार केली आणि पहिल्या एकदिवसीय सामना आपल्या नावे केले. ३) आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकवणारा मुंबई इंडियन्स संघ यावर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. तसेच या हंगामात मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या घरच्या मैदान असलेल्या चेपॉत मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्ली ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकत्तामध्ये २ समाने खेळले जाणार आहेत. ४) मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच सुवर्णपदकाची कमाई करत ती या वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी झेप घेतली आहे. अंतिम फेरीत विनेशने कॅनडाच्या डायना मेरीचा ४-० असा पराभव केला.

Read more

गुन्हे महत्त्वाचे: 1)कल्याण स्टेशन परिसरात चप्पलच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागली असून ते जळून खाक झालं. मात्र, ६ दिवसानी दुकानाची साफसफाई करताना दुकानात एका ११ ते १२ वर्षीय मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहे 2)हडपसर पांढरे मळा येथे राहणारी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला, ही घटना हडपसर येथील अग्रवाल गंगा रेसीडेन्सी या इमारतीच्या ठिकाणी घडली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. 3)शहरातील द्याने परिसरातील एका हिंदू मुलीचे बळजबरीने व बेकायदेशीरपणे धर्मांतर करून मुस्लिम युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे. मुलीच्या आईने याबाबत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. 4)महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सांगलीत बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी एका गाडीवर कारवाई केली आहे. 5)मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीतील मुलीच्या वडिलांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. चाकू, एअरगन, चॉपर यासह हत्यारे घेऊन आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुदैवानं या हल्ल्यात मुलगा बचावला आहे.

Read more

गुन्हे महत्त्वाचे- 1) मुंबईत एका अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.टीव्ही अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी फआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 2) रचिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या नवजात एक महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे. दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली या रागातून एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून या निर्दयी आईने तिची हत्या केली. 3)कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्या मुलीचे वडील व मामा धावून आले. त्यावेळी पालोदकरने चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खुलताबाद येथून तिघांना अटक केली. 4)सेल्फी फोटो व्हायरल करण्याची आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. जुने नाशिक परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. संशयित १७ वर्षीय मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5)मुंबईतून गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच हजार वाहने बेपत्ता झाली असून त्यातील तीन हजार वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला आहे.

Read more

गुन्हे महत्त्वाचे : 1) मुंबईच्या किनारपट्ट्यांवरील तस्करीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. मुंबईत छुप्या मार्गाने येणारे अमली पदार्थ असोत वा करचोरी करुन येणाऱ्या वस्तू, त्या प्रामुख्याने न्हावा-शेवा किंवा अन्य बंदरातून आणल्या जात आहेत. यामुळे महसुल गुप्तचर संचालनालयाने किनारपट्ट्यांवर मोठी मोर्चेबांधणी केली आहे. 2) मुंबईमध्ये दोन दिवसांत तब्बल ८३ कोटी रुपयांची जीएसटी करचोरी उघड झाली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळांच्या टीमनेकेंद्रीय जीएसटीअंतर्गत टाकलेल्या छाप्यात ही करचोरी समोर आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने मुकेश अहुजा नावाच्या व्यापाऱ्याला या प्रकरणात अटक केली. 3) ३ लाखांमध्ये १ हजार ४४० अमेरिकन डॉलर देतो असे सांगून भामट्यांने डॉलरऐवजी वृत्तपत्राचे कागद देऊन भाईंदरमधील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून भामट्यांचा शोध सुरू आहे. 4)भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने कोपरी गावातील एका वृद्धेच्या हाताला व नाकातोंडाला चाकूच्या धाक दाखवून चिकटपट्टी लावून तिच्या अंगावरील सुमारे ४ लाखांचे दागिने लुटून फरार झालेल्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पकडण्यात यश मिळाले आहे.

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू होती. ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लाळ देवा म्हणजेच राणा दग्गुबत्ती याच्या ‘हाथी मेरे साथी’ सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला आहे. यावर त्यांने भरपूर मेहनत केली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. सध्या हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. २) लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार असल्याची माहिती महाभारतात युधिष्ठिर ही भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी नरेंद्र मोदी यांच्या लूकमधील फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. ३) प्रसिद्ध कॉमेडीयन स्टार कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. सध्या तो त्याच्या मुलीमुळे चर्चेत आहे. कपिलच्या गोड मुलीने सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनायराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावर कपिलने ‘माय लिटील रॉकस्टार’ असं कॅप्शन लिहलं आहे. ४) अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगला सध्या सुरुवात झालीय. याचे नाव ‘दसवी’ असे आहे. या सिनेमाच्या सेटवरील अभिषेकचा एक फोटो समोर आला आहे. अभिषेकने स्वत: इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघेही निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या नव्या पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती हे दोघे करत आहेत. अशी माहिती मिळाली आहे.

Read more

गुन्हे महत्त्वाचे : 1)नालासोपाऱ्यात एका रिक्षाचालकाची चाकूने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालवीत असताना एका अज्ञात व्यक्तीने रिक्षा थांबविली. त्याने रिक्षाचालकाचा मोबाइल खेचला. यामध्ये झालेल्या झटापटीत त्याने रिक्षाचालकावर वार केला. 2)वसईतील रिक्षाचालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी मनोर पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वसई येथील रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पत्नी आणि प्रियकर हे दोघंही पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं उघड झालं आहे. 3)‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबई’ या शीर्षकांतर्गत मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल ही संकल्पना राबवायला सुरुवात केली होती. पण अगदी पहिल्या दिवसापासूनच क्लीनअप मार्शल वादात सापडू लागले. दंडाच्या नावाखाली क्लीनअप मार्शल मुंबईकरांकडून एक प्रकारे वसुलीच करु लागले होते. असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल अशोक तावडे या क्लीनअप मार्शलला अटकही केली आहे. 4)उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला असल्याचं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 5)दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी आज (बुधवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे विनापरवाना पिस्तुल, चार राऊंड, दोन तलवारी अशी शस्त्रे आढळली.

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे* १) अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत मुंबईमधील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत आहे. दरम्यान अभिनेता विकास गुप्ता राखीच्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेथील एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. २) अभिनेत्री रवीना टंडने करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रवीनाचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.रवीनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रवीना स्वत: वर सॅनिटायजरचा स्प्रे करताना दिसत आहे. ३) अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी लवकरच चित्रपटसृष्टीत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. मिलन लुथ्रिया दिग्दर्शित ‘तडप’ या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात आहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ४) बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. परिणीती चोप्रा बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ५) बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे.

Read more

गुन्हे महत्त्वाचे : 1)ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका तरुणाने आपल्या मालकाच्या पत्नीची हत्या केली. मालकाच्या पत्नीकडे त्याने शरीरसुखाची मागणी केली. विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात आरोपी तरुणाला अटक केली. गुड्डू कुमार उर्फ रंजन असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तरूण हा डोंबिवलीतील एका किराणा दुकानात काम करत होता. 2)कौटुंबिक कलहातून वडिलाने ब्लेडने गळा चिरून दोन वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर ब्लेडने स्वत:च्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुटीबोरीतील गणेशपूर परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. राधिका किशोर सोयाम, असे मृत चिमुकलीचे तर किशोर सुखदेव सोयामअसे मारेकरी वडिलाचे नाव आहे. 3)साताऱ्यातील सासवड (ता फलटण) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. 4)जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 5) नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 येथे वास्तव्यास असलेले प्रकाश शेट्टीयांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचं सोनं लंपास केलं आहे

Read more

क्रीडा थोडक्यात: १) भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्ट नापास झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर टीममधील अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण नापास झाला. पण त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. २) सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी मेरी कोम तसेच आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल यांच्यासह भारताच्या १२ बॉक्सिंगपटूंनी एकही लढत न खेळता बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत. भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल. ३) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विवाहबंधनात अडकण्याची चर्चा असल्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलासुद्धा मुकण्याची शक्यता बळावली आहे. त्याशिवाय अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. १२ ते २० मार्चदरम्यान अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२०, तर २३ ते २८ मार्चदरम्यान पुण्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ४) भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा उदयोन्मुख फलंदाज कायले मेयर्स यांची ‘आयसीसी’ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन नामांकनात निवड केली आहे. इंग्लंडच्या विरुद्धच्या तीन कसोटींमध्ये २४ बळी घेत १७६ धावा केल्या. तर जो रुटने द्विशतकासह ३३३ धावा करत ६ बळी घेतले. तसेत कायले मेयर्स हा सुद्धा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. ५) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्याउलट फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध कशा प्रकारे कामगिरी उंचावता येईल, याकडे लक्ष द्यावे, असे स्पष्ट मत भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. “चौथ्या कसोटीसाठी मोटेराच्या खेळपट्टीत फारसे बदल होणार नाहीत. तिसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळल्याने फलंदाजांची भंबेरी उडाली. परंतु त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांना पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार नाही,” असे रहाणे म्हणाला.

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) अभिनयातून हिरोपंती करून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस आहे. त्याला ‘मुक्तपीठ’च्या हार्दिक शुभेच्छा… २) अभिनेत्री आणि गायिका श्रद्धा कपूर हीने सध्या मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती तिच्या भावाच्या लग्नासाठी मालदीवला गेली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे तीने चाहत्यांचे मन घायाळ केले आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे. ३) वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण आता अभिनय क्षेत्रात उतरताना दिसतात. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ४) बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेच आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांना अमिताभ यांची काळजी होती. पण नुकतेच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेता विकी कौशल आणि मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लर हे दोघे लवकरच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक विनोदी चित्रपट असल्याची माहिती मिळाली आहे. पण अजूनही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.

Read more
Page 19 of 25 1 … 18 19 20 … 25

ताज्या बातम्या

error: Content is protected !!